Latest

जगातील सर्वात मोठ्या आकाराचे मालवाहतूक करणारे विमान

Arun Patil

वॉशिंग्टन : हे होते जगातील सर्वात मोठ्या आकाराचे व मालवाहतूक करणारे म्हणजेच 'कार्गो' विमान. त्याचे नाव 'अँटोनोव्ह-ए एन-225' किंवा 'म्रिया' असे होते. या विमानाचा असा भूतकाळातील उल्लेख करण्याचे कारण म्हणजे ते रशिया-युक्रेन युद्धात नष्ट झाले आहे. जगातील हे एकमेव महाकाय असे कार्गो विमान होते जे काहीसे बेलुगा व्हेल माशासारखे दिसत असे. त्यामुळे त्याला 'एअरबस बेलुगा' (एअरबस ए 300-600 एसटी बेलुगा) म्हटले जात असे.

या विमानाचे डिझाईन 1995 मध्ये करण्यात आले होते. हे विमान महाकाय असले तरी केवळ दोन व्यक्तींच्या क्रुसह ते उड्डाण करू शकत होते. त्याची लांबी 184 फूट 3 इंच होती. या विमानात दोन जनरल इलेक्ट्रिक 'सीएफ 6-80 सी 2 ए 8' टर्बोफेन आहेत. हे विमान 47 हजार किलोचे वजन घेऊन उडू शकत होते. त्याच्या पंख्यांचा विस्तार 147 फूट 1 इंच होता. विमानाची उंची होती 56 फूट 7 इंच. त्याचा विंग एरिया 2800 चौरस फुटांचा आहे. हे विमान रिकामे असेल तर त्याचे वजन 86,500 किलो असे. त्याचे कमाल टेकऑफ वजन 1,55,000 किलो असू शकते. या विमानाची रेंज 40 टन वजनासह 2,779 किलोमीटर आणि 26 टन वजनासह 4,632 किलोमीटर आहे.

SCROLL FOR NEXT