Latest

जगभरातील ट्रॅफिकची स्थिती घरबसल्या पाहा, गुगल मॅपमध्ये ‘इमर्सिव्ह व्ह्यू’ फीचर

दिनेश चोरगे

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : गुगलने त्याच्या सर्वात मोठा डेव्हलपमेंट उपक्रम आय/वो-२०२३ मध्ये एक नवीन वैशिष्ट्य 'इमर्सिव्ह व्ह्यू' लाँच केले आहे. या फीचरच्या मदतीने युजर्स घरी बसून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी वेगवेगळे मार्ग पाहू शकतील. यासोबतच या मार्गावरील हवेची गुणवत्ता, रिअल टाइम वेदर अपडेट आणि ट्रॅफिकची स्थिती याबद्दल माहिती मिळू शकेल. या शिवाय वापरकर्ते आगाऊ प्रवास करण्याच्या ठिकाणाचे थेट दृश्य पाहू शकणार आहे.

अल्फाबेटचे सीईओ सुंदर पिचाई म्हणाले की, गुगल मॅप लोकांना दररोज २० अब्ज किमी पेक्षा जास्त दिशानिर्देश प्रदान करते. आता नवीन इमर्सिव्ह व्ह्यू फीचरमुळे लोकांचा प्रवास सोपा होणार आहे. तुम्ही चालत असाल, सायकल चालवत असाल किंवा वाहन. इमर्सिव व्ह्यू फीचर आयओएस, अँड्रॉइड आणि गुगल मॅप्स या तिन्ही प्लॅटफॉर्मवर काम करेल.

कसे काम करते इमर्सिव्ह व्ह्यू फीचर

● गुगल मॅपचे इमर्सिव्ह व्ह्यू कॉम्प्युटर व्हिजन आणि एआय एकत्र करून कोट्यवधी मार्ग दृश्य आणि हवाई प्रतिमा जगाच्या डिजिटल सादरीकरणात समावेश करतात. मार्गांसाठी इमर्सिव्ह व्ह्यू त्याच प्रकारे कार्य करते, ज्याप्रमाणे तुम्ही कोणताही प्रवास सुरू करण्यापूर्वी मार्ग पाहता. मार्गांसाठी इमर्सिव्ह व्ह्यू तुम्हाला तुमच्या मार्गाबद्दल आवश्यक असलेली सर्व माहिती एकाच वेळी देते. दुचाकीचा मार्ग, फूटपाथ, चौक आणि पार्किंगची माहिती यासारखे बहु-आयामी अनुभव देण्यासाठी हे विविध पर्याय देण्याचे काम करते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT