Latest

छत्रपती संभाजीनगर : माजी सभापतींसह मुलावर प्राणघातक हल्ला

अनुराधा कोरवी

छत्रपती संभाजीनगर : जमिनीच्या वादातून माजी सभापती रतनकुमार नारायण पंडागळे (70, रा. जयभीम नगर) यांच्यासह मुलावर 10 जणांच्या टोळक्याने प्राणघातक हल्ला केला. यात पंडागळे जखमी झाले. तसेच त्यांच्या कारचीही तोडफोड केली. हर्सूल शिवारात 9 जानेवारीला ही घटना घडली. या प्रकरणी प्रकाश बाबुलाल हरणे (35), किशोर हरणे (32), रुस्तुम नारायण हरणे (50), बाबुलाल हरणे (52), लालचंद ब—म्हकर (48) व ताराचंद वाणी (51) यांच्यावर हर्सूल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

पंडागळे हे हर्सूल शिवारातील गट क्रमांक 240/1 मधील जमिनीवर जेसीबीने साफसफाई करीत होते. आरोपी प्रकाश हरणे इतर साथीदारांसह तेथे गेला. पंडागळे यांचा मुलगा तसेच जेसीबी चालकाला जमिनीवरून निघून जाण्यासाठी धमकावले. काही क्षणांत आरोपींनी मोठा दगड उचलून पंडागळे यांच्या डोक्यात घातला. त्यानंतर लाठी-काठीने दोघांना मारहाण करून प्राणघातक हल्ला केला. अधिक तपास उपनिरीक्षक कृष्णा घायाळ करीत आहेत.

SCROLL FOR NEXT