Latest

छत्रपती संभाजीनगर : मनसेचा मोर्चा पोलिसांनी अडवला, मनसे कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात

स्वालिया न. शिकलगार

छत्रपती संभाजीनगर : पुढारी वृत्तसेवा – छत्रपती संभाजीनगरच्या समर्थनार्थ मनसेचा मोर्चा राजाबाजार येथील संस्थान गणपती मंदिर येथून काढण्यात आला. सरकारने औरंगाबादचे नाव छत्रपती संभाजी नगर केले आहे. या नामांतराला एमआयएमचे नेते, खासदार इम्तियाज जलील यांनी विरोध केला आहे. दरम्यान, नामांतराच्या समर्थनार्थ मनसेच्यावतीने हा मोर्चा काढण्यात आला.

दरम्यान, मोर्चातील कार्यकर्त्यांना रोखण्यासाठी पोलिसांनी बॅरिगेट्स लावले. पाऊस सुरू झाल्य़ानंतर काही काळ कार्यकर्ते बाजूला झाले. तर पोलिसांनी व्हॅनमध्ये आश्रय घेतला. कार्यकर्ते बॅरिगेटजवळ येताच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेण्यास सुरुवात केली. त्यामुळे कार्यकर्ते रस्त्यावर बसले. मनसे कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. यावेळी कार्यकर्त्यांनी खासदार इम्तियाज जलील यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी सुरू केली.

नेत्यांना अटक करून पोलिसांची एक व्हॅन पुढे जाताच रस्ता मोकळा झाला. यावेळी कार्यकर्ते पुढे निघाले, पण त्यांना पोलिसांनी अडविले. नेते, कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यासाठी पोलिसांना भर पावसात चांगलीच कसरत करावी लागली.

SCROLL FOR NEXT