Latest

चेतेश्‍वर पुजारा कौंटी खेळणार

Arun Patil

नवी दिल्‍ली ; वृत्तसंस्था : भारताच्या कसोटी संघाबाहेर बसलेला चेतेश्‍वर पुजारा पुनरागमनासाठी सातत्याने प्रयत्न करताना दिसतोय. मागील दोन वर्षांत कसोटीत सातत्यपूर्ण कामगिरी करू न शकलेल्या चेतेश्‍वर पुजाराला श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत बाकावर बसवण्यात आले. त्यानंतर तो संघात पुनरागमन करण्यासाठी रणजी करंडक स्पर्धेत खेळला; परंतु एकदा 90+ धावा केल्यानंतर त्याला फार काही करता आले नाही.

आता चेतेश्‍वर पुजारा कौंटी चॅम्पियनशीपमध्ये खेळणार आहे. कौंटी चॅम्पियनशीपच्या ससेक्स क्लबने त्याला करारबद्ध केले आहे आणि तो तेथील वन-डे कप स्पर्धेतही खेळताना दिसेल. ट्रॅव्हीस हेडने माघार घेतल्यामुळे चेतेश्‍वरला संधी मिळाली आहे.

हेड व त्याची पत्नी यांना पहिले बाळ होणार असल्यामुळे खेळाडूने क्रिकेटमधून विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला. पुजारा आता संपूर्ण चॅम्पियनशीपमध्ये खेळणार आहे. यापूर्वी त्याने डर्बीशायर, नॉटिंगहॅमशायर व यॉर्कशायर क्लबचे प्रतिनिधित्व केले आहे. चेतेश्‍वर पुजारा म्हणाला, 'ससेक्स कौंटी क्रिकेट क्लबकडून खेळण्यासाठी मी उत्साहित आहे. मी अनेक वर्षे लंडनमध्ये कौंटी क्रिकेट खेळतोय.'

चेतेश्‍वर पुजाराने 95 कसोटीत 43.87 च्या सरासरीने 6713 धावा केल्या आहेत. त्यात 18 शतके व 32 अर्धशतके आहेत आणि नाबाद 206 ही त्याची सर्वोत्तम खेळी आहे. 226 प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पुजाराने 50.59 च्या सरासरीने 16948 धावा केल्या आहेत. त्यात 50 शतके व 70 अर्धशतके आहेत.

SCROLL FOR NEXT