Latest

चीन क्वारंटाईन नियम शिथिल करणार

दिनेश चोरगे

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : चीनने आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी विमानतळे खुली करून दोन आठवडे क्वारंटाईन राहण्याचा नियम हटविण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या आठ जानेवारीपासून त्याची अंमलबजावणी सुरू होईल. चीनमध्ये मोठ्या प्रमाणात कोरोना संक्रमण वाढत असतानाही सरकारने हा निर्णय घेतला आहे.

चीन सरकारने घेतलेल्या या निर्णयाने अनेक देशांची चिंता वाढली आहे. जगभरातील तज्ज्ञांनी याबाबत निरीक्षण नोंदविताना असे म्हटले आहे की, एकीकडे लॉकडाऊन लावला पाहिजे, अशी स्थिती चीनमध्ये असताना घेतलेला हा निर्णय जगासाठी अत्यंत घातक आहे. या निर्णयामुळे वुहानमध्ये दोन वर्षांपूर्वी जी भयानक स्थिती उद्भवली होती, तशी पुन्हा येऊ शकते. चीनमधील अधिकारी मात्र याबाबत डेल्टा इतका ओमायक्रॉन घातक नाही. त्यामुळे आम्ही हा निर्णय घेतल्याचे सांगत आहेत.

SCROLL FOR NEXT