Latest

चार प्रकारच्या कर्करोगांचा छडा लावणारी नवी चाचणी

backup backup

लंडन : बि—टिश वैज्ञानिकांनी आता एक अशी वैद्यकीय चाचणी विकसित केली आहे जिच्या सहाय्याने चार प्रकारच्या कर्करोगांचा छडा लावता येऊ शकतो. विशेषतः महिलांसाठी ही चाचणी विकसित करण्यात आली आहे. या कर्करोगांमध्ये अंडाशय, स्तन, गर्भाशयाची ग्रीवा आणि गर्भाशयातील स्तराच्या कर्करोगाचा समावेश आहे.

ओव्हरीयन म्हणजेच अंडाशयाच्या कर्करोगाने जगभरात अनेक स्त्रियांचा मृत्यू होतो. 75 टक्के प्रकरणांमध्ये ओव्हरीयन कॅन्सरचा छडा तो शेवटच्या स्टेजमध्ये असतानाच लागतो. तोपर्यंत ट्यूमर फैलावलेला असतो. ब—ेस्ट कॅन्सर म्हणजेच स्तनाच्या कर्करोगानेही अनेक महिलांचा मृत्यू होतो.

भारतात महिलांमध्ये होणार्‍या कर्करोगांपैकी स्तनाच्या कर्करोगाचे प्रमाण 27 टक्के आहे. यामध्ये सध्या वाढच होत चालल्याचे दिसून येते. जगभरात दर मिनिटाला एका महिलेस सर्व्हायकल म्हणजेच गर्भाशयाच्या ग्रीवेचा कर्करोग होतो. चीन व भारतात त्याचे सर्वाधिक रुग्ण आहेत. एंडोेमेट्रियल कॅन्सर म्हणजेच गर्भाशयातील स्तरामध्ये निर्माण झालेला कर्करोग. बहुतांशवेळी 55 पेक्षा अधिक वयाच्या महिलांमध्ये हा कर्करोग होतो. या चारही प्रकारच्या कर्करोगांचे निदान करू शकणारी एक चाचणी बि—टिश संशोधकांनी विकसित केली आहे. 'वूमन कॅन्सर रिस्क आयडेंटिफिकेशन टेस्ट' (डब्ल्यूआयडी) असे या चाचणीचे नाव आहे.

या चाचणीत पॅप स्मियर टेस्टने मिळणार्‍या पेशींच्या डीएनएची तपासणी केली जाते. संशोधकांनी युरोपमधील 15 केंद्रांमध्ये सुमारे दोन हजार महिलांची अशी चाचणी केली. ही चाचणी परिणामकारक असल्याचे दिसून आले.

SCROLL FOR NEXT