Latest

घरात सापडली सोन्याची नाणी!

Arun Patil

लंडन : ब्रिटनमध्ये एक वृद्ध दाम्पत्य घराच्या नूतनीकरणासाठी खोदकाम करीत होते. त्यावेळी त्यांना अचानकपणे 400 वर्षे जुनी सोन्याची नाणी सापडली. सध्या या नाण्यांची किंमत अडीच लाख पौंड म्हणजेच सुमारे 2.3 कोटी रुपये आहे. या सोन्याच्या नाण्यांचा लिलाव करून आपले उर्वरित आयुष्य श्रीमंती थाटात जगण्याचा या वृद्ध दाम्पत्याचा मनोदय आहे.

इंग्लंडच्या नॉर्थ यॉर्कशायर येथे गेल्या दहा वर्षांपासून हे वृद्ध दाम्पत्य या घरात राहत आहे. हे जुने घर मोडकळीस आल्याने त्यांनी त्याचे नूतनीकरणा करण्याचे ठरवले.स्वयंपाकघरातील फरशीचे काँक्रिट खोदले जात असताना कुदळ कशामध्ये तरी अडकली. सुरुवातीला त्यांना वाटले की तळाशी इलेक्ट्रिक केबल असू शकते. त्यांनी सावधगिरीने कुदळ वापरण्यास सांगितल्यावर जमिनीत

एक मोठा डबा आढळून आला. या डब्याचे झाकण उघडल्यावर त्यामध्ये 264 नाणी दिसून आली. ही नाणी सुमारे 400 वर्षे जुनी असून त्यांच्यावर राजा जेम्स पहिला व चार्ल्स पहिला यांची नावे कोरलेली आहेत. ही नाणी सन 1610 ते 1727 पर्यंतच्या काळातील होती. आता या नाण्यांचा लिलाव करण्याचे काम त्यांनी 'स्पिंक अँड सन' या लिलाव संस्थेला दिले आहे.

SCROLL FOR NEXT