Latest

ग्रामसेवकांनाही बायोमेट्रिक हजेरी बंधनकारक; ग्रामविकास विभागाचे विभागीय आयुक्तांना निर्देश

दिनेश चोरगे

मुंबई; राजेश सावंत : राज्यातील अनेक ग्रामपंचायतींमध्ये ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी नागरिकांना अनेकदा भेटत नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या कामाचा खोळंबा होतो. याला आवर करण्यासाठी आता ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकाऱ्यांना बायोमेट्रिक हजेरी प्रणाली लागू करण्यात येणार आहे. त्यामुळे वेळेत हजर न राहणे, कामचुकारपणा करणाऱ्या ग्रामसेवकांना चांगलाच चाप बसणार आहे.

गावांमध्ये सरपंचाप्रमाणे ग्रामसेवक हे पदही महत्त्वाचे आहे. पण ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी आपल्याला दिलेल्या वेळेवर हजर राहात नसल्याने नागरिकांच्या समस्या अनेक दिवस प्रलंबित राहतात. याचा सर्वाधिक मनःस्ताप शेतकऱ्यांना सहन करावा लागतो. याकडे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या कणकवली तालुक्यातील करुळ गावचे ग्रामस्थ गोविंद कामतेकर यांनी राज्याच्या ग्रामविकास विभागाचे लक्ष वेधले.

ग्रामसेवक यांची कामाची वेळ सकाळी ९.३० ते सायंकाळी ६.३० असून शनिवार व रविवार या दोन्ही दिवस सुट्टी असते. पण अनेक ग्रामपंचायतींमध्ये ग्रामसेवक सकाळी ११ वाजल्यानंतर कार्यालयात हजर होतात आणि सायंकाळी ४ वाजल्यानंतर गायब होतात. ग्रामसेवकसह ग्रामविकास अधिकारी, तलाठी, कृषी सहायक, आरोग्य खात्यातील कर्मचारी, पशुवैद्यकीय क्षेत्रातील कर्मचारी वेळेत कधीच उपस्थित नसल्याचे कामतेकर यांनी सरकारच्या निदर्शनास आणून दिले होते. या तक्रारीची गंभीर दखल घेत सरकारने ही कार्यवाही केली आहे.

SCROLL FOR NEXT