Latest

गोवा : हरमलात पकडला 67 हजारांचा चरस

दिनेश चोरगे

पेडणे , पुढारी वृत्तसेवा :  पेडणे पोलिसांनी हरमल किनारी भागात नेपाळ येथील विनोद बिके या नागरिकांकडून 67 हजारांचा चरस पकडला. याप्रकरणी गुन्हा दाखल करून संशयिताला अटक करण्यात आली.

निरीक्षक विक्रम नाईक यांनी दिलेल्या माहितीनुसार 28 रोजी हरमल किनारी भागात एक संशयित अमली पदार्थ घेऊन फिरत असल्याची माहिती मिळताच पोलिस उपनिरीक्षक विवेक हलळकर, नवीन देसाई, सागर खोर्जुवेकर, सचिन हळदणकर महेंद्र साखळकर यांनी तातडीने धाव घेऊन 36 वर्षीय विनोद बिके या नेपाळी नागरिकांकडून 67 ग्रॅम चरस जप्त केला. त्याची बाजारात किंमत 67 हजार रुपये आहे पोलीस उपाधीक्षक सिद्धांत शिरोडकर पोलीस अधीक्षक सोबत सक्सेना यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक विक्रम नाईक पुढील तपास करत आहेत.

SCROLL FOR NEXT