Latest

गुलजार : गॅरेजमध्ये काम करणाऱ्या मुलाचे असे बदलले नशीब

सोनाली जाधव

मुंबई; पुढारी ऑनलाईन : प्रतिभावंत कवी, लेखक, शायर, निर्माते, दिग्दर्शक गीतकार गुलजार यांचा आज वाढदिवस.
संपूर्ण सिंह कालरा अस पूर्ण नाव असलेले हे व्यक्तिमत्व गुलजार म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांनी त्यांच्या आशयघन आणि अर्थपूर्ण गीतांनी सर्वांच्या मनावर भुरळ घातली आहे. आपल्या शब्दांनी कळत-नकळत पणे अनेकांच्या दुःखावर मलमपट्टी लावण्याच काम त्यांनी केले आहे.

त्यांना जीवनाच्या सुरुवातीला खूप संघर्ष करावा लागला. अमृतसरमधून मुंबईत आल्यानंतर त्यांनी गॅरेजमध्ये मेकॅनिकमध्ये काही दिवस काम केले. रिकाम्या वेळी ते कविता- शेरो शायरी लिहियाचे. गॅरेजजवळ एक पुस्तकाचे दुकान होते. तेथे भाड्याने पुस्तके वाचायला मिळत होती. गुलजार यांना तेथे जाऊन वाचनाची आवड निर्माण झाली.

एक दिवस प्रसिद्ध निर्माते- दिग्दर्शक विमल रॉय यांची कार खराब झाली. ते आपली कार घेऊन त्याच गॅरेजमध्ये गेले जेथे गुलजार काम करत होते. विमल रॉय यांची गॅरेजमध्ये गुलजार यांच्याशी भेट झाली. विमल रॉय यांनी गुलजार यांना दुसऱ्या दिवशी भेटण्यास बोलावले.

'मोरा गोरा अंग लेइ ले, मोहे श्याम रंग देइ दे'

त्यानंतर गुलजार हे विमल रॉय यांच्यासोबत राहू लागले. तेथेच त्यांची प्रतिभा समोर आली. १९६३ मध्ये बंदिनी चित्रपट प्रदर्शित झाला. त्यातील सर्व गाणी शैलेंद्र यांनी लिहिली. मात्र, यातील एक गाणे गुलजार यांनी लिहिले. 'मोरा गोरा अंग लेइ ले, मोहे श्याम रंग देइ दे' असे ते गाणे होते. हे गाणे त्यावेळी खूप गाजले. या गाण्याने गुलजार यांची नशीब बदलून गेले.

५ राष्ट्रीय, २० फिल्मफेयर पुरस्कार

गुलजार यांना २००२ साली धुऑं या कथासंग्रहासाठी साहित्य अकादमी, स्लमडॅाग मिलेनियर' साठी लिहिलेल्या जय हो या गाण्यासाठी २०१० साली ग्रॅमी पुरस्काराने, २०१३ साली दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. आतापर्यंत त्यांना ५ राष्ट्रीय , २० फिल्मफेयर पुरस्कार प्राप्त झाले आहेत.

विशिष्ट गीतशैली

गुड़्डी, ओंकार, खामोश, आनंद, जान-ए-मन, नमकहराम, सत्या, बंटी आौर बबली, ओंकारा, बावर्ची अशा अनेक चित्रपटांसाठी त्यांनी गिते लिहिली आहेत.

सत्या चित्रपटातील 'सपनें में मिलती हैं', बंटी आौर बबली मधील 'ऑंखें भी कमाल करती हैं पर्सनल से सवाल करती हैं', स्लमडॅाग मिलेनियर मधील 'जय हो', ओंकार मधील 'बीडी आणि नमक इश्क का' अशी बरीच गाणी त्यांच्या विशिष्ट गीतशैलीने प्रसिद्ध झाली आहेत. आजही लोकांच्या मनात ही गाणी रूंजी घालतात.

परिचय, मौसम, लेकिन, अंगूर, अचानक, ऑंधी, किनारा, कोशिश, खुशबू, नमकीन अशा बऱ्याच गाजलेल्या चित्रपटांची निर्मिती केली आहे. धुऑं, मिर्झा गालिब, देवडी, तकसिम, बोस्की आदी पुस्तके त्यांनी लिहिलेली आहेत.

हे पाहिलतं का ? : एक स्त्री आणि दोन पुरूष एकत्र राहू शकतात का? नवी वेबसेरिज 'सोप्पं नसतं काही '

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT