Latest

एकनाथ शिंदेंचे बंड! गुजरात बॉर्डरवरून निसटले; आमदार कैलास पाटील यांचा थरारक प्रवास

Arun Patil

उस्मानाबाद ; पुढारी वृत्तसेवा : एकनाथ शिंदे यांनी सोमवारी डिनरच्या नावाखाली अनेक शिवसेना आमदारांना वेगवेगळ्या वाहनांतून सुरतला नेल्याचे समोर आहे. यामध्ये उस्मानाबादचे आमदार कैलास पाटील यांचाही समावेश होता. मात्र कैलास पाटील गुजरात बॉर्डरवरून निसटण्यात यशस्वी झाले आहेत.

दरम्यान, ठाणे ओलांडल्यानंतर वाहने काही थांबण्याचे नाव घेत नव्हती. त्यानंतर ही वाहने महाराष्ट्र-गुजरात सीमेवर थांबविण्यात आली होती. याचदरम्यान कैलास पाटील लघुशंकेचा बहाण्याने वाहनाबाहेर आले. यानंतर अंधारात कोणालाही दिसणार नाही अशारीतीने ते महाराष्ट्राच्या दिशेने पायी चालू लागले.

अंधार आणि पावसाच्या सरी झेलत कैलास पाटील यांनी आपला प्रवास सुरूच ठेवला. सुमारे चार किलोमीटर अंतर त्यांनी पार केले. यानंतर एका दुचाकीवरून लिफ्ट घेतली. गाव आल्यानंतर दुचाकीस्वार थांबला. त्यामुळे त्यांना पुन्हा पायी प्रवास करण्याशिवाय पर्याय नव्हता. मात्र काही वेळानंतर त्यांनी एका ट्रकमधून लिफ्ट मिळाली आणि ते थेट दहिसरला पोहचले. त्यानंतर त्यांनी वर्षा बंगला गाठला. त्यांना आता वर्षा बंगल्यावर सुरक्षितरीत्या ठेवले असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

SCROLL FOR NEXT