Latest

गिरगावतील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; 23 जणांना अटक

मोहन कारंडे

मुंबई, पुढारी वृत्तसेवा : गिरगाव येथील एका निवासी इमारतीच्या तळ आणि दुसर्‍या मजल्यावर काही तरुणींसह महिलांना डांबून ठेवून त्यांच्या मदतीने सेक्स रॅकेट चालवणार्‍या एका टोळीचा गुन्हे शाखेच्या घाटकोपर युनिटच्या अधिकार्‍यांनी पर्दाफाश केला. या कारवाईत पोलिसांनी 33 पीडित महिलांची सुटका केली.

वैद्यकीय तपासणीनंतर त्यांना महिला सुधारगृहात पाठवण्यात आले. याप्रकरणी भादवीसह पिटा कलमांतर्गत गुन्हा नोंदवून पोलिसांनी 23 आरोपींना अटक केली. त्यांना पुढील चौकशीसाठी व्ही. पी रोड पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आल्याचे पोलीस निरीक्षक सुधीर जाधव यांनी सांगितले. गिरगाव येथील नवलकर लेन, गजानन प्लोअर मिलसमोरील एका निवासी इमारतीत कुंटनखाना सुरू असल्याची माहिती गुरुवारी घाटकोपर युनिटच्या अधिकार्‍यांना मिळाली होती.

या माहितीची शाहनिशा करण्यासाठी पोलिसांनी तिथे बोगस ग्राहक पाठवले. या ग्राहकांकडून ग्रीन सिग्नल मिळताच प्रभारी पोलीस निरीक्षक प्रिया थोरात, सुधीर जाधव व अन्य पोलीस पथकाने गुरुवारी रात्री तळ आणि दुसर्‍या मजल्यावर सुरू असलेल्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला. या कारवाईत पोलिसांनी 23 आरोपींना अटक केली. त्यात आठ ग्राहकांसह ग्राहकांना सेवा पुरवणार्‍या 9, तर 6 एजंटचा समावेश होता.

SCROLL FOR NEXT