Latest

गणेशोत्सवावर कोरोनाचे निर्बंध, पण विसर्जन जय्यत तयारी

Arun Patil

मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : गणेशोत्सवावर कोरोनाचे निर्बंध कायम असले तरी, मुंबई महानगरपालिकेने सर्वाधिक बाप्पांचे विसर्जन होणार्‍या गिरगाव चौपाटीवर सेवा सुविधा पुरवण्यासाठी निविदा मागवल्या आहेत. या सुविधांसाठी सुमारे एक कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. त्यामुळे यंदा गिरगाव चौपाटीवर बाप्पाचे विसर्जन होणार हे निश्चित आहे.

मुंबईत गणरायाच्या आगमनाची जय्यत तयारी सुरू असताना मुंबई महानगरपालिकेने विसर्जन स्थळावर सेवा सुविधा पुरवण्यासाठी जय्यत तयारी केली आहे. यंदाही गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्याच्या सूचना राज्य सरकारने गणेशोत्सव मंडळांना दिल्या आहेत. सार्वजनिक मंडळांच्या मूर्तींची उंची चार फुटांची तर घरगुती गणपतीची मूर्ती दोन फुटांची मर्यादा घालण्यात आली आहे.

नागरिकांची गर्दी होऊ नये म्हणून गणपतीचे दर्शन ऑनलाइन पद्धतीने ठेवावे, यासह विविध प्रकारच्या सूचना मुंबई महानगरपालिकेने केल्या आहेत. मूर्तींच्या उंचीवर निर्बंध असले तरी, गिरगाव चौपाटीवर फुलांची सजावट, पत्रकारांसाठी सुखसागर कॅफे आयडियलजवळ मंडपाची उभारणी, वॉच टॉवर, बॅरिकेडस, मूर्ती संकलन टेबल, स्टील प्लेट्स, व्हॅनिटी, जनरेटर व्हॅन यासह स्टील प्लेट्स आधी सेवा सुविधा पुरवण्यासाठी निविदा मागवण्यात आल्या आहेत.

SCROLL FOR NEXT