Latest

गणेश नाईक यांच्या अडचणीत वाढ कोर्टाने अटकपूर्व जामीन फेटाळला

backup backup

मुंबई ; पुढारी ऑनलाईन : नवी मुंबई महापालिका निवडणुकीच्‍या तोंडावर भाजप आमदार गणेश नाईक यांच्‍या अडचणीत वाढ झाली आहे. रिव्हॉल्व्हर दाखवून ठार मारण्याची धमकी दिल्याच्या आरोपाखाली ऐरोलीचे भाजप आमदार गणेश नाईक यांच्याविरोधात सीबीडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. दरम्यान त्यांनी अटकपुर्व जामीन मिळवण्यासाठी अर्ज केला होता त्यांचा अटकपुर्व जामीन नाकारण्यात आला आहे. यामुळे त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

महिलेच्या तक्रारीनुसार बेलापूर आणि नेरुळमध्ये नाईकांवर बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. ४ दिवसांपासून नाईक नॉट रिचेबल आहे. त्यांच्या अटकेसाठी राष्ट्रवादी, शिवसेना जोरदार आंदोलन करत आहे. नाईकांना कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते, पोलिस त्यांचा शोध घेत आहेत, असं महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी सांगितले.

गणेश नाईक यांच्या अडचणी वाढल्या

दरम्यान, अटकेची टांगती तलवार असलेल्या नाईकांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. अटकेआधी नोटीस देण्यात यावी, यासाठी ठाणे सत्र न्यायालयात हा अर्ज नाईकांकडून दाखल करण्यात आला होता. परंतू कोर्टाने जामीन अर्ज फेटाळून लावला आहे.

सुरुवातीला पीडित महिलेने दोन आठवडे आधी नेरूळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर लागोपाठ दोन गुन्हे दाखल झाल्यामुळे नाईक यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. विधान परिषद उपसभापती नीलम गो-हे यांनी थेट गणेश नाईक यांनी स्वत:हून डीएनए टेस्ट करावी. असे म्हटले होते.

याबाबत नवी मुंबई पोलीस आयुक्तांना एक पत्र पाठवून या प्रकरणी कार्यवाही करण्याची सूचना केली होती. मात्र, महिला आयोगाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतल्याने नेरूळ पोलिसांना पीडित महिलेचे जबाब नोंदवून १६ एप्रिलरोजी रात्री बलात्काराचा गुन्हा दाखल केला.

गणेश नाईक यांचे काय आहे नेमकं प्रकरण ?

गेल्या २७ वर्षांपासून लिव्ह अ‍ॅण्ड रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या एका महिलेने त्यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. नाईक यांच्यापासून आपल्याला एक मुलगा झाला असून तो आता पंधरा वर्षांचा आहे. हा मुलगा पाच वर्षांचा झाल्यानंतर मुलाचा आणि त्याच्या आईचा आपण अधिकृतपणे स्वीकार करू, अशी ग्वाही नाईक यांनी या महिलेला दिली होती. मात्र, नाईक यांनी आपला शब्द फिरवून या महिलेची फसवणूक केली.

नाईकांकडून फसवणूक होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर पीडित महिलेने शरीरसंबंध ठेवण्यास नाईक यांना विरोध केला. मात्र नाईकांनी जबरदस्ती करून आपल्यावर वारंवार अत्याचार केला, अशी तक्रार पीडित महिलेने नेरुळ पोलीस ठाण्यात केल्यानंतर पोलिसांनी नाईक यांच्या विरोधात शनिवारी रात्री बलात्काराचा गुन्हा दाखल केला.

SCROLL FOR NEXT