Latest

गणेश आगमन मिरवणुकीत रात्री 12 पर्यंत ध्वनिक्षेपकास परवानगी

Arun Patil

कोल्हापूर ; पुढारी वृत्तसेवा : गणेश आगमनाच्या मिरवणुकीसाठी बुधवारी (दि. 31) सकाळी सहा ते रात्री 12 वाजेपर्यंत निश्‍चित आवाजच्या मर्यादेत ध्वनिवर्धक व ध्वनिक्षेपक वापरण्यास परवानगीचे आदेश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिले.

ध्वनिवर्धक व ध्वनिक्षेपक वापरण्याबाबत 14 दिवस सूट देण्याचे यापूर्वी घोषित करण्यात आले आहेत. उर्वरित एक दिवस आवश्यकतेनुसार महत्त्वांच्या कार्यक्रमासाठी राखीव ठेवण्यात आला होता. यानुसार बुधवारी गणेश आगमनाच्या मिरवणुकीसाठी ही सूट देण्यात आली आहे.

शहरातील विविध गणेशोत्सव मंडळांनी याबाबत निवेदने दिली होती. त्यानुसार ही परवानगी देण्यात आली आहे. ध्वनिक्षेपक लावण्यासाठी पोलिसांची परवानगी आवश्यक आहे.

SCROLL FOR NEXT