Latest

खोटे मेसेज पाठवाल तर ‘व्हॉट्स अ‍ॅप’ अकाऊंट बंद

Arun Patil

वॉशिंग्टन ; वृत्तसंस्था : 'मेटा' कंपनी संचलित 'व्हॉटस्अ‍ॅप'ने आपल्या नियमांत काही बदल केले आहेत. नव्या नियमांनुसार, काही अकाऊंट्स बंद केले जात आहेत. यापुढेही व्हॉट्स अ‍ॅप नियमांचे उल्लंघन केल्यास अकाऊंट बंद करण्याची कारवाई शक्य आहे. विशेष म्हणजे, अकाऊंटधारकाला कळवून अगर न कळवताही अचानक कारवाई केली जाऊ शकते.

फेक (बनावट, खोटे) मेसेज पाठविणेही अगर सातत्याने स्वीकारणेही नव्या नियमांतर्गत अकाऊंट बंद पडण्यास कारणीभूत ठरू शकते. आमच्या सेवा आणि अटींचे उल्लंघन करताना कुणी आढळून आल्यास, आम्ही त्याच्या अकाऊंटवर बंदी घालू शकतो, असे अ‍ॅपच्या अधिकृत वेबसाईटवर म्हटले आहे.

या 11 गोष्टी केल्यास, खेळ खल्लास!

1) कोणत्याही हेतूने स्वयंचलित किंवा अन्य साधनांचा वापर करून व्हॉट्सअ‍ॅपवरून मोठ्या प्रमाणावर माहिती (डेटा) मिळविल्यास.

2) व्हॉट्सअ‍ॅप युझर्सचे फोन नंबर, त्याचा प्रोफाईल फोटो, स्टेटस आणि इतर माहिती मिळवल्यास तेही कंपनीच्या सेवा अटींचे उल्लंघन ठरेल.

3) व्हॉट्सअ‍ॅपच्या सहाय्याने व्हायरस किंवा मेलवरील फाईल्स शेअर केल्यास. असे व्हायरस अगर फाईल्स पाठवणार्‍यासह आणि इतर युझर्सच्या डिव्हाईसलाही बाधा पोहोचवू शकतात.

4) युझर्सच्या परवानगीशिवाय तुम्ही त्याचा नंबर कोणासोबतही शेअर करू शकत नाही. अवैध सोर्सेसकडून उपलब्ध माहिती व्हॉट्सअ‍ॅप युझर्स वा ग्रुपमध्ये शेअर केल्यास.

5) व्हॉट्सअ‍ॅपवर बनावट अकाऊंट तयार केल्यास वा इतर कोणाचे अकाऊंट कॉपी केल्यास. बिझनेस व्हॉट्सअ‍ॅपमध्ये अनेकदा युझर्सची फसवणूक करण्यासाठी बनावट अकाऊंट तयार केले जाते.

6) एकाचवेळी अ‍ॅटोमेटिक किंवा बल्क मेसेज किंवा ऑटो डायल केल्यास. तसे मेसेज करणारे शोधून काढण्यासाठी कंपनी, 'व्हॉट्सअ‍ॅप मशिन लर्निंग टेक्नॉलॉजी' आणि संबंधित 'व्हॉट्स अ‍ॅप अकाऊंट युझर्स'चा रिपोर्ट समोर ठेवणार आहे.

7) अनधिकृत पद्धतीने व्हॉट्सअ‍ॅप अकाऊंट किंवा ग्रुप तयार केल्यास. एकाहून अधिक ग्रुप तयार करण्यासाठी अन्य ऑनलाईन साधनांचा वापर केल्यास.

8) ब्रॉडकास्ट मेसेजची लिंक एखाद्या अकाऊंटवर सतत शेअर केल्याची तक्रार आल्यास.

9) एखाद्या खात्यावरून तुम्हाला सतत फेक मेसेज येत असतील, तरी तुम्ही ते खाते ब्लॉक न केल्यास. सातत्याने फेक (बनावट, खोटे) मेसेज पाठविल्यास.

10) व्हॉट्सअ‍ॅप कोड बदलण्याचा किंवा सुधारण्याचा प्रयत्न केल्यास.

11) 'गेट व्हॉट्सअ‍ॅप' किंवा 'गेट व्हॉट्सअ‍ॅप प्लस'सारख्या थर्डपार्टीचा वापर केल्यास.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT