राशिवडे : पुढारी वृतसेवा; नंदवाळ (ता. करवीर) येथील परिसरात आज बुधवारी सकाळी बिबट्या सदृश्य प्राण्याचे दर्शन झाले. यामुळे या परिसरातील लोकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. सकाळी वैरणीसाठी गेलेले शेतकरी व जनावरांना चारण्यासाठी गेलेल्या लोकांना जगताप मळा परिसरात हा प्राणी आढळून आला.
वाशी व नंदवाळच्या मध्यभागी हा मळा असून या ठिकाणी हा प्राणी आढळून आल्याचे सांगण्यात आले. ग्रामस्थांकडून माहिती मिळताच वनखात्याचे पथक तपासासाठी नंदवाळ परिसरात दाखल झाले आहे.
हेही वाचा