Latest

कोल्हापूर : फुटबॉल सामन्यातील सेलिब्रेशनवरून खेळाडूला धमकावले; 5 जणांवर गुन्हा 

अमृता चौगुले

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा : शाहू स्टेडियम येथे सुरू असलेल्या फुटबॉल  केएसए लीग सामन्यात गोल केल्यानंतर आनंद व्यक्त केल्याच्या रागातून करण चव्हाण- बंदरे (रा. फुलेवाडी) याच्या घरासमोर जाऊन धमकावल्याचा प्रकार रविवारी रात्री घडला. याप्रकरणी खंडोबा तालीम मंडळाच्या पाच पाठीराख्यांविरोधात जुना राजवाडा पोलिसांत गुन्हा दाखल झाला.

योगेश चौगुले, सौरभ चौगुले, नागेश चौगुले, संदीप पाटील व शिवराज पोवार (सर्व रा. खंडोबा तालीम परिसर, शिवाजी पेठ) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. रविवारी रात्री घडलेल्या या प्रकारानंतर फुलेवाडी तसेच शिवाजी पेठेत रात्री उशिरापर्यंत तणावाचे वातावरण होते.

करण चव्हाण हा शिवाजी तरुण मंडळाचा खेळाडू आहे. रविवारी खंडोबा तालीम मंडळ विरुद्ध झालेल्या सामन्यात त्याने दोन गोल केले होते. गोल केल्यानंतर त्याने सेलिबेशन केल्याचा राग खंडोबाच्या काही पाठीराख्यांना आला. यातून पाच जणांनी रात्री करणच्या घरासमोर जाऊन दहशत माजविण्याचा प्रयत्न केला. घर बंद असल्याने फोनवरून त्याला धमकावले. तसेच धमकीचे मेसेज टाकल्याप्रकरणी या पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT