Latest

कोल्हापूर : केएमटीचा प्रवास आजपासून महागणार

backup backup

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा विविध कारणांनी आर्थिक आरिष्टात सापडलेल्या केएमटीने प्रवाशांना दरवाढीचा झटका दिला आहे. पहिल्या टप्प्यासाठी आठ रुपयांऐवजी दहा रुपये आकारण्यात येणार आहेत. शुक्रवारी (दि. 10) पहाटेपासून दरवाढीची अंमलबजावणी केली जाणार आहे. ना नफा ना तोटा तत्त्वानुसार चालणार्‍या केएमटीला रोज सुमारे अडीच लाख रुपयांचा तोटा सहन करावा लागतो.

सप्टेंबर 2018 मध्ये तिकीट दरवाढ झाली त्यावेळी डिझेलचा दर 72 रुपये होता. सध्या डिझेलचा दर सुमारे 96 रुपये आहे. केएमटीचा दैनंदिन खर्च सध्या 15 लाख आहे. खर्चाच्या पार्श्वभूमीवर केएमटी प्रशासनाने दरवाढीचा निर्णय घेतला आहे. के.एम.टी. उपक्रमाच्या सुधारित प्रवासी भाडे दरपत्रकास प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने मान्यता दिली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT