Latest

कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धा : ब्राझील-अर्जेंटिना अंतिम सामन्यात आमने-सामने

दीपक दि. भांदिगरे

रियो दी जनेरियो; वृत्तसंस्था :  कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेतील अंतिम सामन्यात ब्राझील आणि अर्जेंटिना आमनेसामने येणार आहेत. ब्राझील आणि अर्जेंटिना या दोन बलाढ्य संघातील सामना रविवारी पहाटे होणार आहे. परंतु, जगभरातील फुटबॉलप्रेमींसाठी ही लढत ब्राझील आणि अर्जेंटिना संघामधील नाही. तर लियोनल मेस्सी आणि नेमार या दोघांमधील झुंज आहे.

ऐतिहासिक मराकाना स्टेडियममध्ये होणार्‍या या सामन्यात फुटबॉल इतिहासातील आघाडीचा खेळाडू असलेल्या मेस्सीला रोखण्याचे आव्हान ब्राझीलपुढे असेल. तर, मेस्सीसमोर जगातील सर्वोत्तम रक्षात्मक फळीला मोडीत काढण्याची जबाबदारी असेल.

नेमारच्या ब्राझीलने कोपा अमेरिकेच्या सहा सामन्यांत केवळ दोन गोल गमावले. अनुभवी थियागो सिल्वा, मारकिन्होस आणि एडेर मिलिताओ आलटून पालटून खेळत आहेत. जेणेकरून जोखीमेपासून वाचता येईल.

मिडफिल्डर केसमिरो आणि फ्रेड हे चांगल्या फॉर्मात आहेत. यासोबत डेनिलॉ आणि रेनान लोडी यांना चकविणे सोपे नाही. हे खेळाडू स्पर्धा आयत्यावेळी ब्राझीलला स्पर्धेचे यजमान केल्याने नाराज होते. मात्र, फायनलपूर्वी त्यांचे लक्ष्य केवळ मेस्सीच्या अर्जेंटिनाला पराभूत करण्याचे आहे.

दुसरीकडे अर्जेंटिना संघाने मेस्सीला वाचविण्याचा पर्याय शोधला आहे. मिडफिल्डर रॉड्रिगो डी पॉल आणि जियोवानी लो सेल्सो त्याच्या आजूबाजूला असतात. यासोबतच ते लॉटारो मार्टिनेज आणि निको गोंजालेस यांना चांगला पास देण्यातदेखील यशस्वी ठरतात.

मेस्सीने आतापर्यंत स्पर्धेत चार गोल केले आहेत आणि पाचमध्ये सहाय्यकाची भूमिका पार पाडली आहे. अर्जेंटिनासाठी किताब जिंकण्याचे आपले स्वप्न असल्याचे मेस्सीने यापूर्वी अनेकदा सांगितले आहे.

सध्याचा फॉर्म मेस्सीने अंतिम सामन्यात कायम ठेवल्यास त्याचे हे स्वप्न देखील पूर्ण होऊ शकते.

कोपा अमेरिका अंतिम सामना

अर्जेंटिना विरुद्ध ब्राझिल
रविवारी पहाटे 5.30 वाजता

पाहा व्हिडिओ :

कोल्हापूर : वडणगेच्या प्रणव भोपळेचा 'फुटबॉल फ्रीस्टाईल'मध्ये विश्वविक्रम!

SCROLL FOR NEXT