Latest

केळासारखा दिसणारा छोटा अजगर!

Arun Patil

लंडन : आपल्या अवतीभोवतीच्या पर्यावरणाशी मिळतेजुळते रूप घेऊन शत्रूंना तसेच भक्ष्यालाही चकवा देणारे अनेक जीव आहेत. मात्र, एखादा अजगरही असे छद्मरूप घेणारा असू शकतो याची आपण कल्पना करणार नाही. आता अशाच एका छोट्या अजगराचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. हा अजगर हुबेहूब एखाद्या पिकलेल्या केळासारखा दिसतो!

हा व्हिडीओ पाहत असताना आधी आपल्याला वाटू शकते की दोन केळी ठेवलेली आहेत. मात्र, त्यापैकी एक खरे केळ असून दुसरा वेटोळे घालून बसलेला अजगर आहे हे लक्षात येते. या अजगराच्या देहावर केळासारखाच पिवळा रंग आणि त्यावरील काळे डाग आहेत. एक व्यक्ती वेटोळ्यासह या अजगराला उचलतो आणि त्याचा देह कॅमेर्‍याला दाखवून त्याला पुन्हा केळाजवळ ठेवतो. या काळात हा अजगर शांतपणे आहे त्या स्थितीत बसलेला असतो व केवळ त्याच्या तोंडातून जीभ बाहेर वळवळत असते. इन्स्टाग्रामवर या अनोख्या अजगराचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. हा अजगर केळासारखा दिसतो व त्यामुळेच त्याला 'बनाना बॉल पायथॉन' असे नाव आहे. हा व्हिडीओ हजारो वेळा पाहण्यात आला आहे आणि अनेकांनी त्याला लाईकही केले आहे. निसर्गात किती थक्क करणारे जीव असू शकतात याची प्रचिती या अनोख्या अजगराला पाहून येते.

SCROLL FOR NEXT