Latest

काबूलमध्ये चिनी हॉटेलवर आत्मघातकी बॉम्बहल्ला!

दिनेश चोरगे

काबूल;  वृत्तसंस्था :  काबूल या अफगाणिस्तानच्या राजधानीतील एका चिनी हॉटेलात आत्मघातकी हल्ला झाला आहे. हॉटेलमध्ये अनेक चिनी नागरिक अडकलेले आहेत. समोर आलेल्या फुटेजमध्ये हॉटेलच्या एका भागाला आग लागल्याचे दिसत आहे. तालिबान सरकार किंवा काबूलमधील चिनी दूतावासाने अद्याप कोणतीही माहिती याबाबत दिलेली नाही.

हॉटेलमध्ये आत्मघातकी हल्लेखोर हजर आहेत. तालिबानच्या सुरक्षा दलांना हॉटेलात शिरणे त्यामुळे कठीण जात आहे. हॉटेलमधून गोळीबाराचे आवाज बाहेर येत आहेत. चीनचे अनेक राजकीय व प्रशासकीय अधिकारी या हॉटेलमध्ये येत असतात. गोळीबाराच्या आवाजाने आत काही अघटित तर घडत नाही ना, अशी शंका उपस्थित केली जात आहे. चीनच्या राजदूताने शुक्रवारीच तालिबानी अधिकार्‍यांशी झालेल्या चर्चेत काबूलमधील आपल्या दूतावासाच्या सुरक्षेविषयी चिंता व्यक्त केली होती. अशा परिस्थितीत हा हल्ला झालेला आहे.

पंधरा दिवसांपूर्वी याच भागातील पाकिस्तानी दूतावासावरही गोळीबाराची घटना घडली होती. म्हणून चिनी  हॉटेलचे खरे नाव पश्तुनी भाषेत आहे; पण बहुतेक चिनी नागरिक आणि राजकीय, प्रशासकीय मुत्सद्दी या हॉटेलात सातत्याने येत असल्याने या हॉटेलचे नावच चिनी हॉटेल पडले. हॉटेलात स्नूकर हॉल आणि स्विमिंग पूलसारख्या सुविधा आहेत.

SCROLL FOR NEXT