Latest

‘कांतारा’ रचतोय विक्रमांची मालिका

अनुराधा कोरवी

पुढारी ऑनलाईन : ऋषभ शेट्टीचा 'कांतारा' चित्रपट दररोज नवनवे विक्रम रचत चालला आहे. चित्रपटाच्या डबिंग व्हर्जन्समध्येही चांगली कामगिरी होत आहे. हा चित्रपट जागतिक स्तरावर चांगला व्यवसाय करत असून कन्नड चित्रसृष्टीतील तिसरा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे.

कमाईच्या बाबतीत हा चित्रपट आता फक्त 'केजीएफ 1' आणि 'केजीएफ 2' च्या मागे आहे. या चित्रपटाने प्रदर्शनाच्या अवघ्या 20 दिवसांत जगभर तब्बल 171.41 कोटींची कमाई केली आहे. या चित्रपटाने 'विक्रांत रोना', 'जेम्स' आणि '777 चार्ली'सारख्या चित्रपटांना मागे टाकले आहे. हा वेग असाच सुरू राहिला, तर येत्या काही दिवसांत तो 'केजीएफ 1'च्या आजीवन कलेक्शनचे रेकॉर्डही मोडू शकतो.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT