Latest

कांजुरमार्ग मध्ये भीषण आग

अमृता चौगुले

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : कांजुरमार्ग येथील हेवी इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये सोमवारी सायंकाळी भीषण आग लागली. या आगीत कोणतीही जीवित हानी झालेली नसली, तरी 2 दुकाने जळून खाक झाल्याची माहिती आहे.

अग्निशमन दलाने दिलेल्या माहितीनुसार, या आगीचे नेमके कारण समजले नाही मात्र आगीत परिसरातील झाडेही आगीत जळून खाक झाली. अग्निशमन दलाचे 12 बंब रात्री उशिरापर्यंत आगीवर नियंत्रण मिळवण्याचे  प्रयत्न करत होते.

या ठिकाणी इलेक्ट्रॉनिक्स वस्तू तसेच लाकडी सामान अशा अनेक वस्तूंचे गोदाम आहेत. डबावाला कंपाउंड जवळ ही आग लागली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. मात्र आगीत मोठे मोठे स्फोट होत असल्याने आगीने मध्य रात्री पर्यंत भीषण रूप धारण केले होते.

अग्निशमन दलाच्या वतीने आग विझवण्याचे काम रात्र भर सुरू होते. आग लागताच या ठिकाणचे कर्मचारी बाहेर पडले असून मध्यरात्री पर्यंत कोणतीही जीवितहानी हानी समोर आलेली नाही. मात्र या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.आगीचे कारण समजले नसून रात्रभर या आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न अग्निशमन दल करीत होते. या आगीच्या भीषणतेमुळे आजूबाजूच्या परिसरात मात्र भीतीचे वातावरण पसरले आहे.

SCROLL FOR NEXT