अभिनेता अक्षय कुमारच्या 'ओह माय गॉड-2' या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. या चित्रपटातील हर हर महादेव हे दुसरे गाणे प्रदर्शित झाले आहे. पण या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलले जाण्याची शक्यता आहे. या चित्रपटाला सेन्सॉर बोर्डकडून ए सर्टिफिकेट दिले आहे. आता हा चित्रपट केवळ 18 वर्षांवरील प्रेक्षक पाहू शकतात. यामुळे या चित्रपटाची प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली जाईल, असे समोर आले आहे. या चित्रपटाला मिळालेले ए सर्टिफिकेट आणि आक्षेपार्ह द़ृश्य काढून टाकण्याचा सेन्सॉर बोर्डच्या सूचनेमुळे निर्माते नाराज झाले आहेत. या चित्रपटातून काही गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. त्यामुळे चित्रपटाला यू सर्टिफिकेट दिले पाहिजे, असे निर्मात्यांचे मत आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनाची 11 ऑगस्ट ही तारीख पुढे ढकलली जाईल. कारण आम्ही सेन्सॉर बोर्डाच्या निर्णयाविरोधात लढू इच्छित आहोत, असे निर्मात्यांनी म्हटले आहे.