Latest

ऑलिम्पिक २०२०: कंडोमच्या मदतीनं ‘तिनं’ पटकावलं कांस्य पदक!

रणजित गायकवाड

टोकियो; पुढारी ऑनलाईन : टोकियो ऑलिम्पिक २०२० मध्ये 'कॅनो स्लॅलम' खेळात कांस्य पदक जिंकणारी ऑस्ट्रेलियन खेळाडू जेसिका फॉक्सने पदक जिंकण्याबाबत मोठा खुलासा केला आहे. जेसिका सांगते की; तिने हे पदक कंडोम च्या मदतीने जिंकले आहे.

कंडोमच्या मदतीने ऑलिम्पिक पदक कसं काय जिंकू जाऊ शकते असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असणार. पण ही वस्तुस्थिती आहे.

कॅनो स्लॅलम क्रीडा प्रकारात वापरल्या जाणाऱ्या कयाक (छोटी नाव)ची तात्पुती दुरुस्ती करण्यासाठी कंडोम वापरण्यात आले आहे. ही दुरुस्ती नेमकी कुठं करण्यात आली; याबाबत स्वत: जेसिका फॉक्सने सांगितले आहे. याचा एक व्हिडिओही व्हायरल होत आहे.

अधिक वाचा :

ऑस्ट्रेलियन नाविक जेसिका फॉक्सच्या ऑलिम्पिकमधील या क्रिएटीव्ह कामाची सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे.

जेसी म्हणते की, ऑलिम्पिक दरम्यान खेळ सुरू होण्यापूर्वी माझ्या 'कयाक'ला समस्या आली. कयाकच्या पुढच्या टोकावरील कार्बन फायबरचा भाग खराब झाल्याचे माझ्या लक्षात आले. कॅनो स्लॅलम क्रीडा प्रकारात मला कुठल्याही परिस्थितीत पदक जिंकायचे होते.

त्यामुळे मी डोकं लढवून कयाकची दुरुस्ती करण्यासाठी कंडोमचा वापर केला. या स्पर्धेदरम्यान जे कंडोम वाटण्यात आले होते त्यातीलच एका कंडोम मी वापरले आणि मी ब्रांझ पदकही पटकावले. अर्थात मला सुवर्ण पदक जिंकायचे होते.

पण, असो प्रतिकुल परिस्थितीत ब्रांझ पदक जिंकणे ही माझ्यासाठी आणि माझ्या देशासाठी अभिमानाची गोष्ट आहे, अशी भावना तिने व्यक्त केली.

ऑस्ट्रेलियाच्या सिडनी येथील रहिवासी असणा-या जेसिकाने टोकियो ऑलिम्पिकमध्ये के वन (K1) कॅनो स्लॅलमच्या फायनलमध्ये कांस्यपदक जिंकले. तिने स्पर्धेत तिसरे स्थान मिळवले. तिचा वेग स्पर्धेत सर्वात वेगवान होता आणि ती स्वतःला सुवर्णपदकासाठी पात्र समजत होती, पण वेळेचा दंड झाल्यामुळे तिला तिसरे स्थान मिळाले.

अधिक वाचा :

फॉक्सने महिलांच्या सी वन (C1) कॅनो स्लॅलममध्ये ब्रिटिश रौप्यपदक विजेती मॅलोरी फ्रँकलिनला तीन सेकंदांनी पराभूत करून सुवर्णपदक जिंकले.

जेसिका फॉक्स तीन वेळा कॅनन स्लॅलम के वन (K1) वर्ल्ड चॅम्पियन देखील आहे. यापूर्वी तिने २०१२ च्या लंडन ऑलिम्पिक दरम्यान रौप्य पदक आणि २०१६ च्या रिओ ऑलिम्पिक दरम्यान कांस्य पदक पटकाविले आहे. तिचे पालक देखील ऑलिम्पियन खेळाडू होते.

SCROLL FOR NEXT