Latest

एसटीचे 34 कर्मचारी बडतर्फ तर 26 जणांना सेवा समाप्तीची नोटीस

backup backup

पुणे : पुढारी वृत्तसेवा

पुण्यात एसटी संपातून कर्मचार्‍यांनी माघार न घेतल्यामुळे प्रशासनाने अखेर बडतर्फीचे शस्त्र हाती घेतले आहे.  (Action) शनिवारी प्रशासनाने एसटीचे पुणे विभागातील 34 कर्मचारी बडतर्फ करण्यात आले आहेत. तर 26 कर्मचार्‍यांना कामावर हजर होण्यासाठी सेवा समाप्त करण्याची नोटीस दिली आहे.

एसटीचे 34 कर्मचारी बडतर्फ व  6 कर्मचार्‍यांना कामावर हजर होण्यासाठी सेवा समाप्त करण्याची नोटीस दिल्याने कर्मचार्‍यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. राज्यातील एसटी कर्मचारी विलीनीकरणाच्या मागणीवर ठाम असले. तरी काही ठिकाणी शासनाने साम, दाम, दंड, भेद यानितीचा वापर करून संपात फूट पाडली आहे. मात्र, अजूनही पुणे विभागातील कर्मचार्‍यांच्या संपाची भिंत मजबूत आहे. ती पाडण्यासाठी शासन विविध पातळीवर प्रयत्न करत आहे. (Action)

मात्र, पुणे विभागातील कर्मचारी आपल्या भुमिकेवर ठाम आहेत. त्यामुळे शासनाला अखेर निलंबनाचे शस्त्र हाती घ्यावे लागले. आणि पहिल्या घावातच प्रशासनाने पुणे विभागातील हक्कासाठी लढणारे 34 कर्मचार्‍यांना कायमचे घरी बसवले तर 26 जणांना कामावर हजर राहण्याची नोटीस दिली. यामुळे आता पुणे विभागातील संपाची मजबूत भिंत आणखी किती दिवस टिकणार आहे, हे पहावे लागणार आहे.

1) आत्तापर्यंत निलंबीत केलेले कर्मचारी-331
2) निलंबीत केलेले अन कामावर हजर झालेले कर्मचारी संख्या- 16
3) सेवा समाप्ति नोटीस दिलेले कर्मचारी संख्या- 26
4) सेवासमाप्ती नोटीसवर हजर संख्या -02
5) सेवासमाप्ती केलेले कर्मचारी यांची संख्या – 34

शासनाच्या आदेशाप्रमाणे कर्मचार्‍यांना कामावर हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र, पुणे विभागातील कर्मचारी अद्यापपर्यंत कामावर हजर होत नव्हते. त्यामुळे नाईलाजास्तव आम्हाला ही कारवाई करावी लागली. शनिवारी आम्ही 34 कर्मचारी बडतर्फ केले आहेत.

– ज्ञानेश्वर रणनवरे, विभागीय वाहतूक अधिकारी, एसटी पुणे विभाग

हे ही वाचा :

SCROLL FOR NEXT