Latest

एनएसई घोटाळ्यातील चित्रा रामकृष्ण यांना अटक

Arun Patil

मुंबई ; पुढारी डेस्क : राष्ट्रीय शेअर बाजाराच्या माजी व्यवस्थापकीय संचालिका आणि मुख्य कार्यकारी अधिकारी चित्रा रामकृष्ण यांना अटक करण्यात आली आहे. एनएसई को-लोकेशनप्रकरणी त्यांना अंतरिम जामीन देण्यास दिल्लीतील विशेष न्यायालयाने शनिवारी नकार दिला. यावेळी न्यायालयाने सीबीआयसह सेबीची चांगलीच कानउघडणी केली होती. त्यानंतर सीबीआयने रामकृष्ण यांच्यावर अटकेची कारवाई केली.

हिमालयातील कथित योगीच्या सल्ल्याने एनएसईचे निर्णय घेण्यासह गोपनिय माहिती लीक केल्याचा ठपका रामकृष्ण यांच्यावर ठेवण्यात आला आहे. सीबीआयने याप्रकरणाशी संबंधित मुंबईतील सेबीच्या कार्यालयातील महत्वपूर्ण दस्तावेज आणि डीजिटल पुरावेदेखील हस्तगत केले आहेत. दरम्यान, दिल्लीतील विशेष सीबीआय न्यायालयात रामकृष्ण यांच्या जामीन अर्जावर झालेल्या सुनावणीदरम्यान, न्यायालयाने सीबीआयच्या तपासावर नाराजी व्यक्त करत ताशेरे ओढले होते. एनएसई को – लोकेशन गैरव्यवहार प्रकरणाचा तपास अतिशय संथ गतीने सुरु असल्याबाबत न्यायाधीश संजीव आग्रवाल यांनी सीबीआय आणि सेबीला सुनावले.

चार वर्षे उलटून देखील या प्रकरणातील मुख्य सुत्रधारांवर ठोस कारवाई झाली नाही. संशयितांवर गंभीर आरोप असूनही तपास अद्याप पहील्या टप्प्यात असल्याबाबत न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली. दरम्यान, अलिकडेच प्राप्तिकर विभागाने चित्रा रामकृष्ण यांच्या मुंबईतील घरावर छापा टाकला होता.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT