लंडन : बर्याच वेळा मोठ्या शब्दांऐवजी त्यांचे लघुरूप वापरले जात असते. सध्याच्या घाईगडबडीच्या जीवनशैलीत तर हे अधिकच महत्त्वाचे झाले आहे. असे काही 'शॉर्ट वर्डस्' आता सर्रास रूळले आहेत. त्यापैकीच एक शब्द म्हणजे 'K'. एक हजार या शब्दाऐवजी किंवा अंकाऐवजी हा इंग्रजी 'K' वापरला जातो. सोशल मीडियात फॉलोअर्स वगैरे दर्शवण्यासाठी हा 'K' हटकून वापरतात. हा 'K' आला कुठून हे माहिती आहे का ?
ग्रीक शब्द 'चिलीओई' म्हणजे हजार. यूट्यूब, इन्स्टाग्राम वगैरेवर दिसणारा सध्याचा 'K' ही इथूनच उगम पावला असे म्हटले जाते. 'चिलीओई' या ग्रीक शब्दाचा ज्यावेळी फ्रेंच भाषेत वापर करण्यात आला त्यावेळी त्याचा अर्थ 'किलोग्रॅम' असा झाला. कोणत्याही गोष्टीला हजारने गुणले असता येणारे परिमाण किलोमध्ये असते. जसे 1 हजार ग्रॅम म्हणजे 1 किलोग्रॅम, एक हजार मीटर म्हणजे एक किलोमीटर वगैरे. इंग्रजीत हा शब्द लिहिताना त्याची सुरुवात 'K' पासून होते. ते हजाराचे प्रतीक मानले जाते. त्यामुळे हजारऐवजी केवळ 'K' लिहिण्याची पद्धत सुरू झाली.