Latest

उर्वशी रौतेलाने ऋषभ पंतच्या डेटिंगवर सोडले मौन

अनुराधा कोरवी

पुढारी ऑनलाईन : भारतीय क्रिकेटर ऋषभ पंतला डेट करण्याच्या चर्चा सोशल मीडियावर रंगल्यानंतर अभिनेत्री उर्वशी रौतेलाला ट्रोल करण्यात आले. आता नुकत्याच एका मुलाखतीत उर्वशीने या चर्चांवर अखेर मौन सोडले आहे.

माझ्या वक्तव्याचा लोक असा चुकीचा अर्थ काढतील असे मला वाटले नव्हते. आरपी हा माझा सहअभिनेता आहे आणि त्याचे नाव राम पोथिनेनी आहे. ऋषभ पंतसुद्धा आरपी म्हणून ओळखला जातो हे मला माहीतच नव्हते, असे उर्वशी म्हणाली.

काही दिवसांपूर्वीच उर्वशीने अभिनेता राम पोथिनेनीसोबतचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला होता. लोक फक्त गोष्टी गृहीत धरतात आणि त्याबद्दल लिहितात. अशा अफवांवर विश्वास ठेवणार्‍यांना मी म्हणेन की त्यांनी थोडे भान ठेवावे असा सवाल उर्वशीने केला.

ऋषभ आणि उर्वशी यांच्यात सोशल मीडियावर झालेला वाद सर्वांना माहीत आहे. वादानंतरही ऑस्ट्रेलियात झालेल्या टी-20 विश्वकरंडक स्पर्धेत हजेरी लावली होती.त्यावेळीही उर्वशीला ट्रोल केले होते.

SCROLL FOR NEXT