Latest

उदयनराजे यांनी केली फायरिंग बुलेटवरून हवाई एंट्री

Arun Patil

सातारा ; पुढारी वृत्तसेवा : सातार्‍यात जिल्हा परिषदेच्या मैदानावर बुधवारी रात्री आश्‍चर्य घडलं. उदयनराजे मित्र समूहाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात उदयनराजेंनी बाईकवर स्वार होत 150 फूट उंचीवरून हवेतून थेट स्टेजवर एंट्री केली. मागे-पुढे जाळ सोडत हवेतून आलेली उदयनराजेंची बाईक पाहून बघणार्‍यांच्या काळजाचा काही क्षण ठोका चुकला. हा थरारक प्रसंग पाहताना खचाखच भरलेले मैदान अवाक् झाले. सार्‍यांच्याच भुवया उंचावल्या अन् सुरू झाला एकच जल्लोष. राजेंच्या या जलव्याची अवघ्या राज्यभर चर्चा आहे.

खा. श्री. छ. उदयनराजे भोसले आपल्या हटके स्टाईलने ओळखले जातात. आपली डायलॉगबाजी, टिचकी, कॉलर उडवण्याची स्टाईल आदींमुळे खा. उदयनराजेंची कार्यकर्त्यांमध्ये लोकप्रियतेच्या शिखरावर आहेत. जिल्हा परिषदेच्या मैदानावर त्यांच्या वाढदिवसानिमित्त उदयनराजे मित्र समूहाने एका दिमाखदार कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यासाठी हे विस्तीर्ण मैदान खचाखच भरले होते. कार्यक्रमाचा मनमुराद आनंद लुटण्यात सातारकर मग्‍न होते. अशातच उदयनराजेंची थेट स्टेजवर बाईकवरून एंट्री झाली.

एखाद्या हॉलिवूड, बॉलिवूड अभिनेत्यालाही लाजवेल अशी त्यांची ही एन्ट्री होती. मागे-पुढे जाळ सोडणारी बाईक अन् त्यावर स्वार झालेले उदयनराजे हवेतून स्टेजवर उतरत असल्याचा हा प्रसंग पाहताना उपस्थित सारेच अचंबित झाले.

SCROLL FOR NEXT