Latest

उदयनराजे यांचा पुन्हा एकदा ‘दिलदारपणा’

Arun Patil

सातारा ; पुढारी वृत्तसेवा : खा. श्री. छ. उदयनराजे भोसले हे नेहमी त्यांच्या हटके स्टाईलसाठी ओळखले जातात. कधी कॉलर उडवून तर कधी बाईक रपेट करत उदयनराजे चर्चेत असतात. सोमवारी रस्त्यावरील पुस्तके विकत असलेल्या एका चिमुरडीकडून सर्वच पुस्तके विकत घेत तिला सुखद धक्का दिला. त्यामुळे उदयनराजेंच्या दिलदारपणाचा पुन्हा एकदा जनतेला प्रत्यय आला. सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या प्रसंगामुळं उदयनराजेंनी सर्वांचीच मनं जिंकली आहेत.

त्याचं झालं असं की, उदयनराजे आपल्या कारमधून प्रवास करत होते. यावेळी रस्त्यावर एक चिमुरडी पुस्तकं विकत उभी होती. या चिमुरडीनं उदयनराजेंच्या गाडीजवळ येत पुस्तकं खरेदी करण्याची विनंती केली. यावेळी राजेंनीही दिलदारपणानं या चिमुकलीकडील सर्वच पुस्तकं विकत घेतली. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

आपली हटके स्टाईल, बिनधास्त शैली आणि कॉलर उडवण्याची पद्धत, यामुळं खा. उदयनराजे भोसले नेहमीच चर्चेत असतात. कधी ते सातारच्या रस्त्यावर सुसाट गाडी चालवताना पाहायला मिळतात. तर कधी कार्यकर्त्याच्या दुचाकीवर फेरफटका मारतात. मधल्या काळात त्यांना 'पुष्पा' सिनेमानं भुरळ घातली होती. तर काल-परवा त्यांनी 'चला हवा येऊ दे'च्या मंचावर थेट हवेतून एन्ट्री घेतली होती.

आता उदयनराजेंनी आपला 'दिलदारपणा' पुन्हा एकदा सिध्द केलाय. सातार्‍यात ट्रॅफिक सिग्नलला अशी अनेक लहान मुलं आपल्या पोटापाण्यासाठी कोणत्या ना कोणत्या गोष्टी विकत असल्याचं चित्र आहे. अशीच घटना उदयनराजेंच्या नजरेस पडली अन् त्यांनी या चिमुकलीकडील सर्वच पुस्तकं विकत घेतली. त्यांच्या या कृतीचं सर्वच स्तरातून कौतुक आहे, तर काहींनी अशा मुलींना मदत करण्याची अपेक्षा व्यक्त केलीय.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT