Latest

उत्तराखंड : बस दरीत कोसळून १५ प्रवासी ठार

Arun Patil

देहरादून ; पुढारी वृत्तसेवा : उत्तराखंडमधील उत्तरकाशी येथे जाणारी बस दरीत काेसळून झालेल्‍या अपघातात १५ प्रवासी ठार झाले. अपघातस्‍थळी एसडीआरएफचे जवानांनी धाव घेत मदतकार्य सुरु केले.  या दुर्घटनेत १३ प्रवासी  जखमी झाले आहेत.

मध्य प्रदेशातील पन्ना जिल्ह्यातील रहिवाशांना घेवून बस उत्तरकाशीकडे निघाली हाेती. बसमध्‍ये २८ प्रवासी हाेते. बस दरीत काेसळली. स्‍थानिकांनी याची माहिती पाेलिसांना दिली. पाेलिसांसह एसडीआरएफच्‍या जवानांनी अपघातस्‍थळी धाव घेतली. बस २०० मीटर खोल दरीत काेसळल्‍याने  १५ प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. एसडीआरएफचे जवानांनी जखमींना रुग्‍णालयात दाखल केले.  जखमींपैकी पाच जणांची प्रकृती चिंताजनक आहे.

 हा अपघात दमतापासून नौगावच्या दिशेने दोन किमी अंतरावर झाला. या दुर्घटनेची माहिती मध्‍य प्रदेश सरकारच्‍या माध्‍यमातून मृतांच्‍या नातेवाईकांना देण्‍यात आली असल्‍याचे सूत्रांनी सांगितले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT