Latest

इस्लामपूर : ‘कृष्णा’तर्फे मोफत घरपोच साखर

backup backup

इस्लामपूर; पुढारी वृत्तसेवा : यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या वतीने सभासदांना देण्यात येणार्‍या मोफत घरपोच साखर वितरणाचा प्रारंभ करण्यात आला. कारखाना कार्यस्थळावर मान्यवरांच्या हस्ते साखर पोत्यांच्या वाहनांचे पूजन करण्यात आले.

जयवंतराव भोसले सहकार पॅनेलच्या वतीने अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले व डॉ. अतुल भोसले यांनी कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत प्रत्येक सभासदास दिली जाणारी प्रतिशेअर 60 किलो मोफत साखर घरपोच देण्याचे अभिवचन दिले होते. या अभिवचनाची वचनपूर्ती गेल्या वर्षी केली होती.

यंदाही या मोफत घरपोच साखर वितरणाचा प्रारंभ करण्यात आला आहे. पहिल्या दिवशी कारखाना कार्यक्षेत्रातील कराड तालुक्यातील रेठरे बुद्रुक, वाळवा तालुक्यातील इस्लामपूर तर कडेगाव तालुक्यातील देवराष्ट्रे या गावात सभासदांना साखर वितरण करण्यात आले. कारखाना कार्यक्षेत्रातील प्रत्येक गावांमध्ये नियोजनानुसार मोफत घरपोच साखर वितरित केली जात आहे.

कारखाना कार्यस्थळावर संचालक बाजीराव निकम, कार्यकारी संचालक सूर्यकांत दळवी, वैभव जाखले, बहेचे माजी उपसरपंच मनोज पाटील, सचिव मुकेश पवार, ऊस विकास अधिकारी पंकज पाटील यांच्या प्रमुख

उपस्थितीत साखर पोत्यांच्या वाहनांचे पूजन करून वाहने रवाना करण्यात आली. कराड तालुक्यातील रेठरे बुद्रुक गावामध्ये सोसायटीचे अध्यक्ष व्ही.के. मोहिते, माजी पं. स. सदस्य संजय पवार यांच्याहस्ते सभासदांना साखर पोत्यांचे वितरण करण्यात आले.

इस्लामपूरमध्ये संचालक संजय पाटील यांच्याहस्ते साखर पोत्यांचे वितरण करण्यात आले. देवराष्ट्रे गावामध्ये संचालक बाबासो शिंदे यांच्याहस्ते सभासदांना साखर पोत्यांचे वितरण करण्यात आले.

SCROLL FOR NEXT