Latest

इचलकरंजी : दारात झोपलेल्या अल्पवयीन मुलीस अंथरुणातून पळवून नेले

backup backup

इचलकरंजी ; पुढारी वृत्तसेवा : येथील पुजारी मळा येथून अंगणात झोपलेल्या परप्रांतीय अल्पवयीन शाळकरी मुलीस अंथरुणातून पळवून नेल्याचा धक्कादायक प्रकार सोमवारी घडला. याबाबत शिवाजीनगर पोलिस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. तथापि या घटनेला सहा दिवस उलटूनही पोलिसांच्या हाती काहीच लागत नाही. त्यामुळे मुलीचे नातेवाईक पोलिस ठाण्यासमोर रोज टाहो फोडत आहेत.

मूळचे उत्तर भारतीय असलेले विनोदकुमार बिंड हे गेल्या 20 वर्षांपासून परिवारासह पुजारी मळा येथे भाड्याने राहतात. ते स्वतः यंत्रमाग कामगार आहेत. राहण्याची जागा अपुरी, त्यातच उकाडा सुरू झाल्याने त्यांची मुले अंगणात झोपतात. सोमवारी (दि. 4) इयत्ता आठवीमध्ये शिकणारी मुलगी व तिचा लहान भाऊ दोघे अंगणात झोपले होते.

मध्यरात्री एकच्या सुमारास विनोदकुमार लघुशंकेसाठी उठले असता त्यांना एकटाच मुलगा अंगणात झोपल्याचे आढळले. अंथरुणात मुलगी नसल्याचे पाहून त्यांनी पत्नीला उठवून वस्तुस्थिती सांगितली. त्यामुळे एकच आरडाओरडा सुरू झाला. रडण्याचा आवाज ऐकून शेजारी घटनास्थळी आले.

विनोदकुमार यांनी घडलेला प्रकार शेजार्‍यांना सांगितला. शोधाशोध सुरू केली. मात्र, मुलगी मिळून आली नाही. मुलगीचे चप्पल दारातच होते. त्यामुळे कोणी तरी अंथरुणात झोपेत असलेल्या मुलीला पळवून नेल्याचा संशय विनोदकुमार यांनी व्यक्त केला. याबाबत शिवाजीनगर पोलिसांत त्यांनी फिर्याद दिली.

पोलिस यंत्रणा विविध पातळीवर तपास करीत आहे. लवकरच या प्रकरणाचे धागेदोरे हाती लागतील, असा विश्वास आहे.
– रूपाली पाटील, सहायक पोलिस निरीक्षक, तपासी अधिकारी

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT