Latest

आशियाई चॅम्पियनशिप स्पर्धेत पूजा दानोळे हिचे यश

Arun Patil

हुपरी ; पुढारी वृत्तसेवा : दिल्‍ली येथे सुरू असलेल्या एशियन ट्रॅक सायकलिंग चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये इंगळी येथील पूजा बबन दानोळे हिने टीम पराशूट या सांघिक प्रकारात रौप्यपदक तर वैयक्‍तिक प्रकारात कांस्यपदक मिळवून महाराष्ट्राचे व देशाचे नाव आशिया खंडात स्पर्धेत झळकावले. या स्पर्धा शनिवार (18 जून) पासून सुरू झाल्या आहेत.

दिल्‍ली येथील आईजी स्टेडियम वेलड्रोम येथे या स्पर्धा सुरू असून 22 देशांतील स्पर्धकांनी सहभाग घेतला आहे. सबज्युनियर श्रेणीतील 4 किलोमीटर पराशूट प्रकारात हिमांशी, रिता कपूर, जस्मिन आणि कोल्हापूर जिल्ह्यातील इंगळी येथील पूजा दानोळे यांच्या टीमने रौप्य पदकाची कमाई केली.

आज झालेल्या 2 किलोमीटर वैयक्‍तिक प्रकारात पूजाने कांस्यपदक मिळवले आहे. यापूर्वी पूजाने हैदराबाद येथील राष्ट्रीय स्पर्धेत 16 वर्षांखालील वैयक्‍तिक पराशूट प्रकारामध्ये तिने सुवर्णपदक पटकावत नवे राष्ट्रीय रेकॉर्ड केले आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर सुवर्ण पदक पटकावून भारताचे नाव या स्पर्धेत उंचावण्यासाठी अहोरात्र सराव करीत असल्याचे पूजाने दिल्‍लीहून दै.'पुढारी'शी बोलताना सांगितले.

SCROLL FOR NEXT