Latest

आर्यन खानसोबत सेल्फी घेणारा किरण गोसावी लखनौमध्ये

Arun Patil

मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : आर्यन खानसोबत सेल्फी घेणारा आणि पुणे पोलिसांनी फरार घोषित केलेला आरोपी किरण गोसावी लखनौमध्ये असल्याचे काही वृत्तवाहिन्यांच्या बातमीदारांनी शोधून काढले. त्याच्याशी मोबाईलवरून बातचीतही केली.

सुरुवातीला आपण पुणे पोलिसांना शरण जाणार नसून लखनौ पोलिसांसमोर शरणागती पत्करू, असे गोसावी सांगत होता. मात्र, लखनौ पोलिसांनी त्याला ताब्यात घेण्यास नकार दिला आहे. पुणे पोलिसांसमोर हजर व्हावे, असा सल्‍ला लखनौ पोलिसांनी त्याला दिल्याचे वृत्त आहे.

गोसावीचा शोध फरासखाना पोलीस आणि गुन्हे शाखेची पथके घेत असल्याचे स्पष्ट करताना त्याचा ठावठिकाणा शोधण्याचा आम्ही प्रयत्न करत आहे. पण त्याने आमच्याकडे शरण येण्याबाबत कोणताही संपर्क साधला नसल्याचे परिमंडळ 1 च्या पोलिस उपायुक्‍त डॉ. प्रियंका नारनवरे यांनी स्पष्ट केले आहे.

गेल्या आठवड्यात किरण गोसावी याची मॅनेजर शेरबानो मोहम्मद इरफान कुरेशी (वय 27, रा. गोवंडी मुंबई) हिला पुणे पोलिसांनी अटक केली होती. गोसावीने नोकरीच्या आमिषाने तरुणांना आर्थिक गंडा घातला आहे. त्याने तरुणांकडून घेतलेले पैसे शेरबानो हिच्या बँक खात्यावर आल्याचे आढळल्याचे पोलिसांनी सांगितले होते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT