Latest

आटपाडीत सुविधांसाठी पाच कोटी मंजूर : आमदार पडळकर

अमृता चौगुले

आटपाडी; पुढारी वृत्तसेवा : आटपाडी नगरपंचायतीच्या परिक्षेत्रात नागरी सेवा सुविधा उपलब्ध करून देणार्‍या विविध 46 विकासकामासाठी नगर विकास विभागाने पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असल्याची माहिती आमदार गोपीचंद पडळकर यांनी दिली.

या निधीतून नगरपंचायत परिसरातील बंदिस्त गटर, सिमेंट काँक्रीटचे रस्ते, सुशोभीकरण, स्वच्छतागृह आदी कामे केली जाणार असल्याचेही ते म्हणाले.

आमदार पडळकर म्हणाले, आटपाडीला आता नगरपंचायत झाली आहे. त्या तुलनेत सुविधा नाहीत. लोकांची मागणी आणि गरज लक्षात घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांची भेट घेऊन त्यांना याबाबत माहिती दिली. नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी नगरविकास विभागाने विविध 16 कामांसाठी पाच कोटी रुपये मंजूर केले आहेत. लवकरच कामाच्या निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन कामे सुरू होतील. यामुळे नागरी प्रश्‍न मार्गी लागतील असा विश्‍वास व्यक्त केला.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT