Latest

अर्थखात्याच्या कामकाजाची ‘धरोहर’मुळे लोकांना माहिती

backup backup

पणजी ः पुढारी वृत्तसेवा गोव्यात स्थापन होणारे धरोहर संग्रहालय गोवेकरांसह पर्यटकांना अर्थ खात्याच्या कामकाजाची सविस्तर माहिती उपलब्ध करील, असे प्रतिपादन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केले. येथे शनिवारी आझादी का अमृतमहोत्सव अंतर्गत अर्थखात्याद्वारे मेकेनीज पॅलेस येथे आयोजित उपक्रमात त्या बोलत होत्या. प्रदर्शनाचे उद्घाटन करताना सोबत केंद्रीय अर्थराज्यमंत्री पंकज चौधरी, जीएसटी मंडळाचे सदस्य व वाहतूक मंत्री मावीन गुदीन्हो, तरुण बजाज, संगीता सिंग , जीएसटी मंडळाचे आदी उपस्थितीत होते.

त्या म्हणाल्या, देश घडवण्यासाठी सर्वांचे सहकार्य गरजेचे असते. किमान गव्हर्नमेंट व कमाल गव्हनर्स या ध्येयातून सरकारचे काम चालू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या हितासाठी निरंतर कार्यरत रहा हा मंत्र आम्हांला दिला आणि त्यानुसार आम्ही काम करत आहोत. देशाच्या हितासाठी हवी ती पावले केंद्र सरकारने उचलल्यामुळेच देशात भरीव बदल घडला आहे. पंंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या स्वातंत्र्याच्या 75 वर्षाचा आनंदोत्सव सर्वच खात्यांना विविध माध्यमातून साजरा करण्याचे आदेश दिले. त्यानंतर अर्थ खात्याने विविध उपक्रम सुरू केले. गोव्यात स्थापन होणारे धरोहर संग्रहालय त्यांचाच एक भाग आहे.

गोव्याच्या विकासासाठी अर्थ खात्याचे मोठे योगदान आहे असे गुदिन्हो यांनी सांगितले. जीएसटीच्या लाभाचा फायदा गोव्याला मिळणे गरजेेच असल्याचे त्यांनी सांगितले. उद्घाटनासह संग्रहालय माहिती पुस्तिकेचे प्रकाशन झाले. विविध माहितीपट दाखविण्यात आले. कस्टम हाऊस येथे स्थापन केलेल्या आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत धरोहर या आर्थिक विषयक संग्रहालयाचे उद्घाटनही सीतारामन यांनी केले.

SCROLL FOR NEXT