Latest

अमेरिकेच्या ताब्यात एलियन?

Arun Patil

वॉशिंग्टन : एलियन म्हणजेच परग्रहवासीयांच्या हालचालींबाबत हॉटस्पॉट असलेल्या 'एरिया 51' मध्ये काम करणार्‍या एका माजी अभियंत्याने आता दावा केला आहे की अमेरिकेने एका एलियनला बंदी बनवलेले आहे. या ठिकाणी खरोखरच एलियन्स होते असा दावा या माणसाने केला आहे. आपण स्वतः अमेरिकेच्या या गोपनीय लष्करी तळावर काम केल्याचेही त्याने म्हटले आहे.

71 वर्षे वयाच्या या इंजिनिअरला 'एलियन्स एक्सपर्ट' म्हणूनच ओळखले जाते. सर्वसामान्य लोकांपेक्षा या माणसाला 'एरिया 51' बाबत अधिक माहिती आहे व त्याठिकाणी त्यांनी काही प्रयोगही केलेले आहेत. या माणसाचे नाव आहे बिल यूहाऊस. यापूर्वीही त्यांनी अनेक वेळा या लष्करी तळावर घालवलेल्या काळाविषयी अनेक प्रकारची माहिती उघड केली आहे. यूहाऊस आणि अन्य इंजिनिअर एलियन टेक्नॉलॉजीच्या डिसमँटलिंगवर काम करीत होते आणि लष्करी अधिकारी व अन्य इंजिनिअर एलियन्सकडून मिळालेल्या तंत्रज्ञानाची रिव्हर्स-इंजिनिअरिंग करीत होते.

साईटवर एलियन्सना 'ईबीई (एक्स्ट्राटेरेस्ट्रीयल बायोलॉजिकल एंटीटीज) म्हणून ओळखले जाते. या 'ईबीई'वर यूहाऊस अन्य अभियंत्यांसह काम करीत होते असा त्यांचा दावा आहे. ही साईट इतकी गोपनीय का ठेवली जाते या प्रश्नावर त्यांनी म्हटले आहे की अमेरिका आणि संयुक्त राष्ट्रसंघामधील एका करारानुसार हे ठिकाण गुप्त ठेवले जाते. संयुक्त राष्ट्रसंघ आणि अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष आयसेनहॉवर यांच्यामध्ये हा करार झाला होता असे त्यांचे म्हणणे आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT