Latest

अभिनेत्री अँबर हर्डची हालत खराब!

Arun Patil

पुढारी ऑनलाईन डेस्क : अभिनेता जॉनी डेप आणि अभिनेत्री अँबर हर्ड या पूर्वाश्रमीच्या पती-पत्नीचा मानहानी खटला संपूर्ण जगात गाजला. या खटल्याने जॉनीला न्याय मिळवून दिला. काही वर्षांपूर्वी जेव्हा अँबरने जॉनीवर आरोप केले. तेव्हापासून जॉनीचा जणू बॅडपॅचच सुरू झाला होता. त्याच्यासोबत चित्रपट करण्यास स्टुडियोजनी नकार दिला. हातातले चित्रपट गेले, पण या सर्वांपेक्षाही आपली काही चूक नसताना आपल्या मुलांना मानहानी सोसावी लागत असल्याचे पाहून जॉनी खूप दुःखी झाला होता. आणि मग त्याने हा खटला दाखल केला होता. यथावकाश सर्व सत्य समोर आले. जॉनीने खटला जिंकला. त्यामुळे अँबरला कोर्टाने 10.35 मिलियन डॉलर (सुमारे 82 कोटी रुपये) नुकसानभरपाई देण्यास सांगितले आहे.

आता अँबरची आर्थिक स्थिती खूपच खराब झाल्याचे कळते. त्यामुळेच तिला चक्क एका अ‍ॅडल्ट फिल्म वेबसाईटकडून चित्रपट करण्याबाबत ऑफर मिळाल्याचे समजते. नुकतेच एका श्रीमंत अरबी व्यक्तीने अँबरला लग्नाची ऑफर दिली होती. लग्न केल्यास सर्व कर्ज फेडू, असेही त्याने म्हटले होते. नुकतेच तिने तिचे घरही 1 मिलियन डॉलरला विकले आहे. 'अ‍ॅक्वामॅन-2'मधूनही तिला डच्चू दिल्याच्या अफवा पसरल्या होत्या, पण तसे नाही. तथापि, एकंदरीत अँबरची परिस्थिती सध्या खूपच वाईट झाली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT