Latest

अतिवृष्टीमुळे पाचवी व आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा 20 ऐवजी 30 जुलैस

गणेश सोनवणे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेतली जाणारी पाचवी व आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. राज्यात सध्या अतिवृष्टीची परिस्थिती बघता परीक्षेसाठी कोणताही अडथळा येऊ नये म्हणून 20 जुलैला होणारी ही परीक्षा आता 31 जुलैस होणार आहे.

परीक्षेसाठी याआधी देण्यात आलेले प्रवेशपत्र ग्राह्य धरले जाणार आहे. कोविड 19 मुळे मागील वर्षी शाळा उशिरा सुरू झाल्यामुळे शिष्यवृत्ती परीक्षा वेळेत झाल्या नव्हत्या. त्यामुळे गत शैक्षणिक वर्षातील शिष्यवृत्ती परीक्षा 20 जुलै रोजी निश्चित करण्यात आली होती. मात्र, मागील आठवड्यापासून राज्यात सर्वदूर अतिवृष्टी सुरू असून, हवामान पूर्वानुमान विभागाने यापुढेही पाऊस सुरू राहणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT