Latest

अजिंक्यतारा, प्रतापगड, सज्जनगडावर रोप वे

Arun Patil

सातारा; पुढारी वृत्तसेवा : सातारा-कागल राष्ट्रीय महामार्गाच्या सहापदरीकरणासाठी 2 हजार 9 कोटी, खंबाटकीच्या दुसर्‍या बोगद्यासाठी 493 कोटी आणि कराड -चिपळूण नवीन राष्ट्रीय महामार्ग असा सुमारे 3 हजार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करण्यात आला आहे. याचबरोबर प्रतापगड, अजिंक्यतारा आणि सज्जनगड येथे रोप वे ला मंत्री नितीन गडकरी यांनी मंजुरी दिली आहे. या कामांमुळे जिल्ह्याच्या विकासाला चालना मिळणार आहे, अशी माहिती खा. उदयनराजे भोसले यांनी पत्रकाद्वारे दिली.

सातारा-कागल या मार्गाच्या सहापदरीकरणासाठी व खंबाटकी बोगद्याच्या कामासाठी निधीची मागणी केली होती. जिल्ह्यातील तीन ठिकाणांच्या रोप-वेचा दिलेला प्रस्ताव मंजुरीसाठी सादर करण्यात आला होता. जिल्ह्याच्या पश्‍चिम भागाच्या विकासकामांसाठी खा. उदयनराजेंनी पाठपुरावा केला होता.

चालू अधिवेशन काळात मंत्री गडकरी यांनी प्रतापगड, अजिंक्यतारा आणि सज्जनगड या किल्ल्यांवर जाण्यासाठी रोप वे च्या प्रस्तावाला तत्त्वत: मंजुरी दिली आहे. त्यासाठी आवश्यक तो निधी लवकरच मंजूर करण्याची ग्वाहीही मंत्री गडकरी यांनी खा. उदयनराजेंना दिली आहे.

राष्ट्रीय महामहार्गाचे शेंद्रे ते कागल टप्प्यातील सहापदरीकरणाच्या कामास 2009 कोटी रुपये आणि खंबाटकी बोगद्याच्या उर्वरित कामासाठी 493 कोटी रुपये मंजूर केले आहेत. चिपळूण ते कराड या नवीन राष्ट्रीय महामार्गासाठीही मंत्री गडकरी निधी उपलब्ध करून देणार आहेत.

SCROLL FOR NEXT