Latest

अंतराळ प्रवासातच मृत्यू झाला तर?

Arun Patil

न्यूयॉर्क : जन्म आणि मरण हे माणसाच्या हाती नसते. त्यामुळे अंतराळ प्रवास सुरू असतानाच एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर त्याच्यावर अंत्यसंस्कार कसे करतात असा एक प्रश्न अनेकांच्या मनात येऊ शकतो. पृथ्वीवर अंत्यसंस्काराचे अनेक प्रकार आहेत. मात्र, अंतराळात मृत्यू झाला तर एखाद्याच्या मृतदेहाचे काय केले जाते याची माहिती एक अंतराळवीर टेरी विटर्स यांनी दिली आहे.

टेरी यांनी म्हटले आहे की एखाद्या अंतराळवीरासाठी अंतराळातच मृत्यू येण्यासारखी वाईट बाब दुसरी नाही. अंतराळ यानात मृतदेह जतन करून ठेवण्याची व्यवस्था नसते. तसेच मृतदेह पृथ्वीवर आणण्यासाठी मोहीम पूर्ण होईपर्यंत वाटही पाहता येत नाही. त्यामुळे अंतराळवीराचे शव एअरलॉकमध्ये पॅक करून अंतराळातच सोडले जाते. अंतराळातील थंड स्थितीने त्याची आईस ममी बनते.

अर्थात ही सर्व माहिती त्यावेळी समजली ज्यावेळी 'नासा'च्या अपोलो मोहिमेदरम्यान स्पेस सूटची चाचणी घेण्यात आली. अंतराळातील दाबामुळे मृतदेहामध्ये स्फोट होतो. अंतराळात गुरुत्वाकर्षण नसते. त्यामुळे तिथे सर्व वस्तू तरंगत राहतात.

त्यामुळे ज्यावेळी एखादा मृतदेह अनंत विस्तार असलेल्या अंतराळात सोडला जातो त्यावेळी तो अनंत काळापर्यंत अंतराळातच तरंगत राहू शकतो. तिथे लाखो-करोडो वर्षे मृतदेह तरंगत राहू शकतो. आतापर्यंत अंतराळात केवळ तीन अंतराळवीरांचा मृत्यू झाला आहे. सध्या एक स्विडिश कंपनी प्रोमेसा 'अंतरीक्ष शवपेशी' बनवण्याबाबत काम करीत आहे.

ती अंतराळवीराचा मृतदेह बर्फाच्या क्रिस्टलच्या फ्रीज-ड्राय टॅबलेटमध्ये सुरक्षित ठेवील. कॅनेडियन अंतराळवीर ख्रिस हॅड फिल्ड यांनी सांगितले की जर मंगळावर एखाद्या अंतराळवीराचा मृत्यू झाला तर त्याचे शव तिथेच दफन केले जाईल.

SCROLL FOR NEXT