Latest

Zomato Deepinder Goyal Marriage : कोण आहे ग्रेसिया मुनोझ ? दीपिंदर गोयल यांनी केलं ‘या’ मॉडेलशी लग्न?

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : फूड डिलिव्हरी ॲप झोमॅटोचे संस्थापक दीपंदर गोयल यांनी मॅक्सिन मॉडेल ग्रेशिया मुनोझशी लग्न केल्याचे समोर आले आहे. (Zomato Deepinder Goyal Marriage) मुनोज आणि दीपंदर फेब्रुवारीमध्ये हनीमूनवरून परतले. हा खुलासा दोघांपैकी एकाने नाव न सांगण्याच्या अटीवर केला. (Zomato Deepinder Goyal Marriage)

ग्रेशिया मुनोझने जे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत, त्यावरून असे दिसते की, ती आता भारतात आहे.

कोण आहे ग्रेशिया मुनोझ?

जानेवारीमध्ये ग्रेशिया मुनोझने दिल्लीतील प्रसिद्ध ठिकाणांना भेट दिली आहे. तेथील फोटोदेखील तिने शेअर केले असून त्याला Dilli Darshan (Part 1) – glimpses of my new life at my new home अशी कॅप्शन दिली आहे. रिपोर्टनुसार, मुनोझनं गोयल यांच्याशी दुसरे लग्न केले आहे.

दीपिंदर गोयल ४१ वर्षांचे आहेत. ते गुरुग्राममध्ये राहतात. कन्सल्टींग फर्म बेन अँड कंपनीतील त्यांनी आपली नोकरी सोडली होती. २००८ मध्ये रेस्तराँ अॅग्रीगेटर आणि फूड डिलिव्हरी कंपनी झोमॅटोची स्थापना केली होती.

पुढे झोमॅटो शेअर बाजारात लिस्ट झाल्य़ानंतर गोयल देशातील सर्वात श्रीमंत लोकांपैकी एक ठरले. ब्लूमबर्ग बिलेनिअर इंडेक्सनुसार झोमॅटोत त्यांच्या हिस्स्याची किंमत ६५० मिलियन डॉलर्स इतकी झाली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT