Latest

कोल्हापूर : जिल्हा परिषद कर्मचार्‍यांना सोमवारपासून हेल्मेट सक्ती?

Arun Patil

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : हेल्मेटसक्तीबाबत संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त होत असल्याच्या पार्श्वभूमीवर प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने शुक्रवारी सकाळी जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारात मोटारसायकल- स्वारांना अडवून हेल्मेटबाबत विचारणा करण्यात आली. या निमित्ताने कागदपत्रांची व लायसन्सची तपासणी करण्यात आली. लायसन्स नसणार्‍यांकडून दंड वसूल करण्यात आला.

जिल्हा परिषदेमध्ये सकाळीच प्रादेशिक परिवहनचे पथक दाखल झाले. जिल्हा परिषदेत आरटीओ पथक का आले आहे हेच समजत नव्हते. त्यांनी प्रवेशद्वाराचा ताबा घेत येणार्‍या प्रत्येक दुचाकी वाहनधारकांकडे हेल्मेटबाबत विचारणा केली. बहुतांशी कर्मचारी हेल्मेटविनाच येतात. पथकातील कर्मचार्‍यांनी या कर्मचार्‍यांकडे गाडीची कागदपत्रे, लायसन्स याची विचारणा करण्यात येऊ लागली. यामध्ये काही कर्मचार्‍यांकडे लायसन्सही नसल्याचे आढळून आले. या पथकाने सर्व कर्मचार्‍यांना सोमवारपासून हेल्मेट घालून येण्यास सांगितले.

SCROLL FOR NEXT