पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूडच्या अनेक चित्रपटांमध्ये काम केलेली अभिनेत्री जरीन खानच्या अडचणीत वाढ झाली आहे. अभिनेत्रीविरोधात 5 वर्षे जुन्या प्रकरणात अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे. 2018 साली काली पूजनाच्या उद्घाटन समारंभात एक प्रकरण घडले होते. झरीन खानविरुद्ध कोलकाता येथील नरकेलडांगा येथे पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली होती. आता न्यायालयाने जरीन खानविरोधात अटक वॉरंट जारी केले आहे.
जरीन खान पूर्वीच्या तुलनेत आता फार कमी चित्रपटांमध्ये दिसत आहे. मात्र अभिनेत्री आता तिच्या वैयक्तिक आयुष्याबाबत अडचणीत सापडली आहे. जरीन लाइमलाइटपासून दूर आहे आणि अलीकडेच तिला डेंग्यू देखील झाला आहे. अलीकडेच, तिचा एक व्हिडिओ देखील समोर आला ज्यामध्ये ती संवाद साधत होती. यावेळी तिने सांगितले होते की ती आजाराला कव्हर करत आहे आणि पूर्वीपेक्षा तब्बेत आता चांगली आहे.
काली पूजनाच्या आयोजकांनी जरीन खानवर गंभीर आरोप केले आहेत. त्याच्या म्हणण्यानुसार, जरीनने अंडरवर्ल्डमध्ये पोहोचल्याचे कारण देत आयोजकांना धमकी दिली होती. याबाबत जरीनकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. 5 वर्षे जुन्या प्रकरणात जरीन खानवर काय निर्णय होतो हे पाहणे बाकी आहे.
जरीन खान ही सलमान खानच्या जवळची आहे, अशी चर्चा आहे. जरीनने सलमानच्याच चित्रपटातून पदार्पण केले. 2010 मध्ये आलेल्या वीर या चित्रपटात ती दिसली होती. या चित्रपटाने अपेक्षेप्रमाणे कमाई केली नाही पण असे असूनही कतरिना कैफशी साम्य असल्यामुळे तिला खूप लोकप्रियता मिळाली. ती रेडी, हाऊसफुल 2, हेट स्टोरी 3, अक्सर 2 आणि चाणक्य यांसारख्या चित्रपटांमध्ये दिसली आहे. २०२१ मध्ये आलेल्या हम भी अकेले तुम भी अकेले या चित्रपटात तीने शेवटचे काम केले.