Latest

YouTube : यू ट्यूबचा पहिला व्हिडीओ कोणता?

Arun Patil

वॉशिंग्टन : आज मोबाईल हातात घेतला की, त्यामध्ये लगेचच आपला हात काही अ‍ॅप्स ओपन करण्यासाठी सर्रास जातो. यातलेच एक अ‍ॅप म्हणजे, यू ट्यूब. (YouTube) काळानुरूप बदलणार्‍या या प्लॅटफॉर्मवर आजच्या घडीला असंख्य व्हिडीओ आणि इतर कंटेंट शेअर करण्यात आला आहे. किंबहुना या घडीलासुद्धा यू ट्यूबवर कैक लाखजण काही ना काहीतरी शेअर करत असतील.

मोठे व्हिडीओ, शॉर्ट व्हिडीओ, स्टोरीज, थंबनेल आणि तितकेच कलात्मक हेडिंग्स या सर्व कंटेंटचा खच 'यू ट्यूब' (YouTube) नावाच्या या अफलातून प्लॅटफॉर्मवर पाहायला मिळतो. विश्वास बसणार नाही; पण प्रचंड शिक्षण घेतलेल्यांपासून अगदी चार इयत्ताही न शिकलेल्यांपर्यंत तसेच लहानग्या मुलांपासून वयोवृद्धांपर्यंत अनेकांसाठी यू ट्यूब उपजीविकेचे साधन ठरले आहे; मात्र यू ट्यूबवर पहिला व्हिडीओ कोणता होता, हे माहिती आहे का?

साधारण 17 वर्षांपूर्वी यू ट्यूबचे (YouTube)  सहसंस्थापक जावेद करिम यांनीच या आगळ्यावेगळ्या प्लॅटफॉर्मची सुरुवात करण्यासाठी एक व्हिडीओ पोस्ट केला होता. असे म्हटले जाते की, तो यू ट्यूबचा पहिलाच व्हिडीओ आहे. या व्हिडीओमध्ये खुद्द जावेद दिसत असून, तो सॅन दियागो झूमध्ये असणारे अवाढव्य हत्ती दाखवताना दिसत आहे. 'मी अ‍ॅट द झू' असे या व्हिडीओचे शीर्षक आहे.

24 एप्रिल 2005 ला शेअर करण्यात आलेल्या या 19 सेकंदांच्या व्हिडीओला आजच्या क्षणापर्यंत 249,526,176 व्ह्यूज मिळाले आहेत. अल्गोरिदम किंवा नवी शीर्षक देण्याची पद्धत काहीही नाही, तरीही हा धुसरसा व्हिडीओ तेव्हाही खास होता आणि येणार्‍या काळातही तितकाच खास असणार आहे. कारण, हा आहे यू ट्यूबचा (YouTube)  सर्वात पहिलावहिला व्हिडीओ.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT