Latest

बीडमध्ये तरुणाचा डोक्यात दगड घालून खून

निलेश पोतदार

बीड, पुढारी वृत्तसेवा शहरापासून जवळच असलेल्या चराटा रोडवरील रेल्वे क्रॉसिंग पुलाजवळ (सोमवार) रात्री एका तरुणाचा डोक्यात दगड घालून खून केल्याची घटना घडली. ही घटना आज (मंगळवार) सकाळी उघडकीस आली. पांडुरंग माने (राहणार आनंदवाडी तालुका जिल्हा बीड) असे या तरुणाचे नाव आहे.

घटनेची माहिती मिळताच बीड ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विश्वास पाटील यांच्यासह कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते. पंचनामा केल्यानंतर मृतदेह जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला. दरम्यान पांडुरंग माने हे ज्यांच्या सोबत होते ते सीसीटीव्ही मध्ये दिसत असून, लवकरच त्यांना ताब्यात घेतले जाणार असल्याचे पोलीस निरीक्षक विश्वास पाटील यांनी सांगितले.

हेही वाचा :  

SCROLL FOR NEXT